प्रस्तुत लेखात सिंहाविषयी मराठी माहिती (Lion Information In Marathi) देण्यात आलेली आहे. सिंहाचे अस्तित्व, सिंहाचे वर्णन, आणि सिंहाचे राहणीमान अशा सर्व मुद्द्यांची चर्चा या लेखात करण्यात आलेली आहे.
जंगलाचा राजा – सिंह | Sinh Marathi Mahiti |
लहानपणापासून आपण विविध प्राण्यांच्या कथा वाचत आलेलो आहोत. त्यामध्ये सर्वात भीतीदायक प्राणी कोणता वाटला असेल तर तो म्हणजे सिंह!
स्वतःला वाटेल तेव्हा शिकार करणे, कोणालाही न घाबरणे, ऐटीत चालणे, आणि स्वतःच्या वनक्षेत्रात परकीय प्राण्याचे आक्रमण होऊ न देणे, अशा काही गुणांमुळे त्याला जंगलाचा राजा म्हटले जाते.
सिंह हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो. सिंहाचे अस्तित्त्व पूर्वीपासूनच आहे. सिंहाचे शास्त्रीय नाव पँथेरा लिओ असे आहे. इंग्लिशमध्ये त्याला Lion (लायन) असे म्हटले जाते.
सिंहाला पोहता सुध्दा येते. सिंह हा मांसाहारी प्राणी आहे. तो शाकाहारी प्राण्याची शिकार करतो. विशेष म्हणजे सिंह हा रात्रीच्या अंधारात शिकार करतो. विशेष म्हणजे जास्तीत जास्त शिकार सिंहिनी करतात.
सिंहाचे एकूण चार प्रकार पडतात. आफ्रिकी सिंह, आशियाई सिंह, युरोपियन सिंह आणि बरबेरी सिंह!
सिंहाची शरीररचना –
• सिंहाचा रंग करडा – तांबडा असतो. नर सिंहाला आयाळ असते तर मादी सिंहाला आयाळ नसते. सिंह हा १५० ते २५० किलो वजनाचा असतो.
• सिंहाला चार पाय, आयाळ, अणकुचीदार दात, आणि एक शेपटी असते.
• सिंहाच्या तोंडात अणकुचीदर दात असतात आणि पायाच्या पंजालासुद्धा तीक्ष्ण नखे असतात, ज्यामुळे केलेली शिकार त्यांना घट्ट पकडता येते.
• सिंहाच्या आवाजाला गुरगुरणे म्हणतात तर त्याच्या आक्रोशपूर्ण आवाजाला डरकाळी असे म्हणतात.
तुम्हाला सिंह मराठी माहिती (Lion Information In Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा…
लेखन सौजन्य – प्रीती पवार (सातारा)