फुगडी मराठी माहिती | Fugadi Information In Marathi |

प्रस्तुत लेख हा फुगडी या खेळाविषयी मराठी माहिती (Fugadi Information In Marathi) देणारा लेख आहे. महाराष्ट्रातील संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा नृत्यप्रकार अतिशय नाटकीय पद्धतीने खेळला जातो.

फुगडी हे एकप्रकारे लोक नृत्य आहे परंतु अतिशय आनंदी आणि मजेशीर हे नृत्य असल्याने याला खेळ देखील म्हटले जाते. “फुगडी खेळूया” असेच नेहमी फुगडी खेळताना म्हटले जाते.

फुगडी माहिती मराठीमध्ये |

फुगडी हा खेळ महाराष्ट्रातील एक लोकप्रिय खेळ आहे. हा खेळ विशेषकरून स्त्रिया आणि मुली सांस्कृतिक कार्यक्रमावेळी किंवा सण समारंभाला खेळतात. फुगडी हा खेळ एकप्रकारे लोकनृत्य आहे. यामध्ये महाराष्ट्राचे सांस्कृतिक दर्शन घडते.

पंढरीच्या वारीमध्ये पुरुषसुद्धा फुगडी खेळताना आढळतात. फुगडी खेळताना विविध गीते म्हटली जातात. चित्रपट, सांस्कृतिक, अथवा लोकगीतांचा यामध्ये समावेश असतो. फुगडी खेळताना उखाणीसुद्धा बोलली जातात ज्यामधून एकमेकांची थट्टा केली जाते.

काही उखाणे म्हणजे प्रश्नोत्तरेच असतात. यामध्ये प्रश्नाची आणि उत्तराची एक विशिष्ट लयबद्धता आढळते. कार्यक्रमाचे औचित्य, उल्हासपूर्ण वातावरण, आणि फुगडीचे नृत्य-संगीत यामुळे प्रत्येक सण – समारंभ सांस्कृतिक पद्धतीने विशिष्ट ठरतो.

फुगडी कशी खेळली जाते?

• फुगडी खेळात दोन किंवा जास्तीत जास्त आठ महिला खेळू शकतात.

• एकमेकाचे हाताचे पंजे पकडुन उड्या मारीत महिला गोल-गोल फिरतात.

• जी महिला थकेल ती पराजित होते. त्यानंतर पराजित महिलेला उखाणे घ्यावे लागतात, अथवा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात.

फुगडीचे प्रकार –

फुगडी खेळण्याच्या पद्धतीवरून फुगडीचे प्रकार पडले आहेत.

• एक हाती फुगडी
• भुई फुगडी
• दंड फुगडी
• कासव फुगडी
• बस फुगडी
• नखुल्या
• लोळण फुगडी
• पाट फुगडी

स्त्रिया सांस्कृतिक सण जसे की पंढरपूर वारी, मंगळागौर, गणपती विसर्जन आणि नवरात्र उत्सव इ. मंगल प्रसंगी हा खेळ खूपच उत्साहात खेळतात. फुगडी खेळात खूप कसरत आणि शारीरिक हालचाल होते. शारीरिक दुखणी किंवा व्याधी असलेल्या स्त्रियांनी फुगडी खेळणे टाळावे.

तुम्हाला फुगडी मराठी माहिती (Fugadi Information In Marathi) हा लेख आवडला असल्यास तुमचे मत नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा…

Leave a Comment