प्रस्तुत लेख हा मोबाईल नसता तर (Mobile Nasta Tar Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. मोबाईलमुले आपले जीवन खूपच सुविधामय बनलेले आहे, परंतु मोबाईल नसता तर काय झाले असते अशा कल्पनेचा विस्तार विद्यार्थ्यांनी या निबंधात करायचा असतो.
मोबाईल नसता तर…
काल रात्री मोबाईलमध्ये अलार्म लावला आणि मोबाईल बाजूला ठेवून दिला. तेवढ्यात अचानक एक विचार मनात आला की सकाळपासून रात्री झोपेपर्यंत आपली सर्व कामे कळत – नकळतपणे मोबाईलवरच अवलंबून आहेत. मोबाईलमुळे जीवन अगदी सहज झालेले आहे. असा हा मोबाईलच नसता तर काय झाले असते?
मोबाईल ही आता माणसाची सोय राहिली नसून अन्न, वस्त्र, निवारा यांसारखी एक मूलभूत गरज बनली आहे. मोबाईलशिवाय माणूस संपर्क क्षेत्रात एवढी प्रगती करू शकलाच नसता. जागतिक स्तरावर लोकांना जोडण्याचे काम मोबाईलनेच केलेले आहे.
मोबाईलमुळे सारे जग जलद बनले आहे. पूर्वी तासनतास वेळ लागणारी कामे आता क्षणार्धात होऊ लागलेली आहेत. मोबाईलशिवाय सध्या सारे जग अपूर्ण आहे. मोबाईल नसता तर परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांशी एवढ्या सहज संपर्क साधणे शक्यच झाले नसते.
आधुनिक काळात मोबाईलमुळे एवढी प्रगती झाली आहे की घरबसल्या आपण जगाच्या कानाकोपऱ्यातील कोणतीही माहिती मिळवू शकतो. जगातील प्रक्षेपित घडामोडी थेट पाहू शकतो. घरबसल्या कधीही ऑनलाईन शॉपिंग करू शकतो. मोबाईल नसता तर या सर्व गोष्टी सहजरीत्या करता आल्या नसत्या.
मोबाईल व इंटरनेटमुळे रेल्वे, बस, विमान यांची तिकीटही घरबसल्या सहज काढू शकतो. त्यामुळे प्रवास सुखकर झालेला आहे. मोबाईल नसता तर आपल्याला तासनतास रांगेत उभे राहून तिकीट काढावे लागले असते. मोबाईल नसता तर एकाच वेळी अनेक कामे करणे शक्य झाले नसते.
मोबाईलच्या अतिवापरामुळे डोके दुखणे, डोळ्यांचे व मेंदूचे आजार, मानसिक ताणतणाव वाढणे असे विकार वाढत आहेत. मोबाईल नसता तर मोबाईल वापराचे तोटे सहन करावेच लागले नसते. त्याव्यतिरिक्त लोकांनी पुस्तके वाचणे, संवाद साधणे, खेळ खेळणे अशा गोष्टींना वेळ दिला असता.
मोबाईलमुळे आपली महत्त्वाची माहिती चोरीस जाऊन त्याचा गैरवापर होण्याची शक्यता वाढली आहे. मोबाईल नसता तर आपली महत्त्वाची माहिती गुप्त ठेवता आली असती. मोबाईल नसता तर लोकांनी खूप सारा वेळ स्वतःचे छंद जोपासायला आणि इतर कामात व्यतित केला असता.
मोबाईल नसता तर आपल्याला घरबसल्या सेवा आणि सुविधा प्राप्त झाल्या नसत्या. म्हणजेच मोबाईल वापरण्याचे जे फायदे आहेत ते झालेच नसते. एकंदरीत विचार करता मोबाईलचा शोध हा मनुष्यासाठी एक उत्तम सुविधा आहे परंतु त्याचा मर्यादित वापर हाच मनुष्यासाठी फायदेशीर ठरेल.
तुम्हाला मोबाईल नसता तर हा मराठी निबंध (Mobile Nasta Tar Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…