प्रस्तुत लेख हा झाडाविषयी मराठी निबंध (Tree Essay In Marathi) आहे. अत्यंत मुद्देसूद आणि सोप्या भाषेत हा निबंध मांडण्यात आलेला आहे.
झाड मराठी निबंध | Tree Marathi Essay | Tree Marathi Nibandh |
झाड हा मानवाच्या जीवनातील आणि निसर्गातील अविभाज्य व महत्त्वपूर्ण घटक आहे. झाड आपल्याला ऑक्सिजन देते आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेते. त्यामुळे वातावरण शुद्ध राहण्यास मदत होते.
झाड आपल्याला फळे-फुले तसेच सावली देते. झाडापासून मिळणाऱ्या लाकडांचा उपयोग इमारती, घरे बांधण्यासाठी होतो आणि झाडांच्या लाकडांचा उपयोग वेगवेगळ्या वस्तू, कागद तसेच फर्निचर तयार करण्यासाठी होतो.
सध्या जगामध्ये जास्त प्रमाणात झाडे तोडली जात आहेत. लोकसंख्या आणि औद्योगिकीकरण वाढल्याने जंगलाचे प्रमाण कमी होत चाललेले आहे. त्याचा विपरीत परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे.
आपल्याला शुद्ध व निरोगी वातावरण हवे असेल तर झाडे लावणे खूपच गरजेचे आहे. झाडे दूषित वायू शोषून घेऊन त्याचे रूपांतर ऑक्सिजनमध्ये करतात आणि आपल्याला शुद्ध वायू देतात. म्हणून आपल्या आजूबाजूला झाडांची हिरवळ असणे गरजेचे आहे.
झाडाचे कार्य हे निसर्गनियमानुसार होत असते. त्याची निर्मिती आणि वाढ होण्यामागे निसर्गाचे खूप मोठे योगदान असते. झाडाची निर्मिती ही फळांमधील बियांपासून होत असते. योग्य प्रकारची जमीन आणि पाणी मिळाल्यास झाडांची वाढ चांगली होते.
झाडे मोठी होण्यासाठी खूप वर्षाचा कालावधी जात असतो त्यासाठी त्यांना तोडणे हे अत्यंत चुकीचे कृत्य आहे. झाडे ही नेहमीच मानवी जीवनासाठी उपयोगी आहेत. मानवाला होणारे झाडाचे फायदे जाणून घेऊन त्यांच्याप्रती कृतज्ञतापूर्वक वागणे सध्याची गरज बनलेली आहे.
तुम्हाला झाड – मराठी निबंध (Tree Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…
लेखन सौजन्य – निकिता पवार (सातारा)
The Essay was so good ,I love it , Thank you !