प्रश्न – जागतिक जल दिन (World Water Day) कधी साजरा केला जातो?
उत्तर – जागतिक जल दिन प्रत्येक वर्षी २२ मार्च या दिवशी साजरा केला जातो.
पाण्याचे महत्त्व समजावून देणे आणि पाण्याचे सुयोग्य पद्धतीने संवर्धन करण्याच्या दृष्टीने जागतिक जल दिन (Jagatik Jal Din) साजरा करण्यात येतो. पाण्याच्या विविध मुद्द्यांवर जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम वर्षभर राबवले जातात. त्या सर्व उपक्रमांची सुरुवात जागतिक जल दिनापासून होत असते.
Table of Contents
जागतिक जल दिन – मराठी माहिती | World Water Day Information In Marathi |
• सर्व सजीव सृष्टीला आवश्यक असणारे पाणी हे वापरासाठी स्वच्छ आणि प्रदूषणरहित असणे गरजेचे आहे. याबाबतचे विचार जनमाणसांत रुजवले जाणे अत्यावश्यक आहे. पाण्याचे महत्त्व समजण्यासाठी आणि पाण्याच्या सर्व समस्यांचे निराकरण होण्यासाठी दरवर्षी २२ मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा करण्यात येतो.
जागतिक जल दिनाचे महत्त्व – Importance of World Water Day In Marathi
• पृथ्वीवर पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत अत्यल्प प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे अशा स्त्रोतांच्या शाश्वततेबाबत विचार होणे गरजेचे आहे. तेथील पाण्याचा वापर काळजीपूर्वक करून ते प्रदूषित होऊ न देणे यांबाबत योग्य दिशेने प्रयत्न होणे आणि त्यासंबंधी जनजागृती होणे आवश्यक आहे.
• सर्व सजीवांसाठी पाण्याचे महत्त्व अपरंपार आहे. मनुष्य तर पाण्याची परिभाषा जीवन अशीच करतो. त्यामुळे पाण्याचे संवर्धन होणे किती गरजेचे आहे हे आपल्याला कळून येते. सध्या आपल्या जीवनात पाण्याचा व्यवस्थित वापर होऊन भविष्यातील पिढ्यांसाठी देखील ते शुद्ध स्वरूपात उपलब्ध असणे ही आपली सामाजिक आणि नैतिक जबाबदारी आहे.
• मनुष्याला पाण्याचे महत्त्व सर्व प्रकारे कळाले तरच आपण सर्वजण मिळून जलसंवर्धन करू शकू आणि पाण्यासंबंधित ज्या समस्या आहेत त्या दूर करू शकू. असा उदात्त हेतू ठेवून जागतिक जल दिन विविध प्रकारे साजरा केला जातो.
जागतिक जल दिन कसा साजरा केला जातो?
• सर्वप्रथम जनजागृती होण्यासाठी प्रसारमाध्यमे जसे की टीव्ही, मोबाईल व संगणक यांवरून लोकांना पाण्यासंबंधी जागरूक केले जाते. त्यानंतर काही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष (ऑनलाईन) उपक्रमांत सहभागी करून घेतले जाते.
• युनायटेड नेशन (वाॅटर) ही संस्था जागतिक जल दिनाचे आयोजन करते. प्रत्येक वर्षी पाण्याविषयी एक नवीन संकल्पना आणि उपक्रम ही संस्था राबवत असते. त्यामध्ये जगभरातून विविध सामाजिक संस्था आणि लोक सहभागी होत असतात.
• प्रामुख्याने या संस्थेशी जोडले गेलेले सदस्य देश जल दिनाच्या उपक्रमात सहभागी असतात. सध्या पाण्यासंबंधी असलेली वास्तविक समस्या आणि मानवी गरज पाहून उपक्रमाची रूपरेषा ठरवली जाते. त्या उपक्रमासाठी वर्षभर प्रयत्न केले जातात.
• पाणी व शाश्वत विकास ही संकल्पना मानव व सृष्टीच्या शाश्वत विकासावर आधारित होती. अशाप्रकारे यावर्षीही म्हणजेच २०२२ साली “ग्राउंडवॉटर” ही संकल्पना मांडली गेलेली आहे.
• तुमच्या परिसरात ग्राउंडवॉटर स्वच्छ आहे का? ते तुमच्या जीवनावर कसे काय परिणाम घडवून आणते? अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न यावर्षी केला गेला आहे.
प्रश्न – जागतिक जल दिन सर्वप्रथम कधी साजरा करण्यात आला?
उत्तर – २२ मार्च १९९३.
पाणी वापराबाबत घ्यावयाची काळजी –
• पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करणे.
• पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होऊ न देणे.
• पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत शुद्धतम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असणे.
निष्कर्ष –
मानवी स्वैराचार वाढल्याने नैतिक मूल्ये कमी झालेली आहेत त्यामुळे मनुष्य हा निसर्गावर देखील आक्रमण करत आहे. त्याचे घातक परिणाम मनुष्याला वारंवार भोगावे लागलेले आहेत. औद्योगिक विकास आणि लोकसंख्यावाढ यांमुळे मनुष्य स्वकेंद्रित होत गेलेला आहे.
मानवी स्वार्थापोटी नैसर्गिक संसाधने प्रदूषित होत आहेत. त्यातीलच एक जीवनावश्यक घटक म्हणजे पाणी! जल प्रदूषण आणि पाण्याचा अयोग्य पद्धतीने वापर अशा समस्यांचा सामना करण्यासाठी मानवी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठीच जागतिक जल दिन (२२ मार्च) हा दिवस आपल्या परिसरातील पाण्याच्या संवर्धनासाठी शुभ मुहूर्त म्हणता येईल.
जागतिक जल दिन – मराठी माहिती (Jagatik Jal Din Mahiti Marathi) हा लेख वाचण्यासाठी तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!