प्रेम हे स्त्री आणि पुरुष या दोन व्यक्तींमध्ये होणारा संवाद आहे की आकर्षणामुळे करावा लागणारा संवाद आहे. आजची प्रेमाची संकल्पना ही खूप विषाक्त होऊन राहिली आहे. चित्रपट किंवा मालिकेतून दाखवण्यात येणारे प्रेम आणि वास्तविक प्रेम यात खूपच फरक आहे.
भावना व वासना यातील फरक
प्रत्येक व्यक्ती जन्मतः स्वतंत्र आहे. त्यामुळे दुसऱ्याची आपल्या आयुष्यात दखल किती असावी हे आपणच ठरवतो. त्यावरून मग आपणदेखील दुसऱ्याच्या आयुष्यात किती झाकून बघावे याचा विचार केला पाहिजे. ‘व्यक्तीला मदत करणे, आणि अडचणीत असेल तर करुणा दाखवणे हे आपले कर्तव्य आहे’ याला भावना म्हणायचे.
‘एखाद्या व्यक्तीचा आपल्या फायद्यासाठी वापर करून घेणे, आणि त्याला स्वतंत्रता न देणे, सतत त्याला बदलण्याचा प्रयत्न करणे’ याला हिंसा किंवा वासना म्हणायचे.
प्रेम म्हणजे प्रेम असतं? खरचं, तुमचं आमचं सेम असतं….?
– पुरुष आणि स्त्री जर एकमेकांबद्दल आदर बाळगून असतील तर ते नातं खूपच सुंदर होत जातं.
– कोणीच परिपूर्ण नसतं याची जाणीव जितक्या लवकर होईल तेवढे चांगलं.
– एखाद्या वादावर मिळून तोडगा काढणे केव्हाही चांगले. त्यातून तुम्हाला वास्तविकता समजायला मदत होते आणि ब्रेकअप, घटस्फोट यासारख्या प्रसंगातून तुम्ही दूर राहता.
– ‘हट्ट आणि वाद ‘ हे मानसिक आहेत हे समजून घ्या. नाहीतर तुम्ही नात्यात खूप अंतर वाढवचाल.
– शरीर, मन वेगवेगळे आहेत याची जाणीव करून घ्या. म्हणजे शारीरिक आकर्षण संपल्यानंतर सुद्धा तुमचे प्रेम अबाधित राहील.
हे सुद्धा वाचा- केस माझे ..पण केसांबद्दलच्या समजुती मात्र दुसऱ्यांच्या!