देव दिवाळीचे महत्त्व जाणून घेणे आपल्यासाठी उपयुक्त ठरेल अशी आम्हाला वाटते. त्यानिमित्ताने देव दिवाळी म्हणजे काय हा लेख नक्कीच तुमच्यासाठी वाचनीय ठरेल…
देव दिवाळी – मराठी माहिती | Dev Diwali Marathi Mahiti |
• देव दिवाळी म्हणजे देवतांची दिवाळी असा समज आहे. हा सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. परंतु प्रामुख्याने हा सण कोकणात साजरा केला जातो.
• देव दिवाळीचे एकूण पाच दिवस असतात.
कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी साजरी केली जाते.
• देव दिवाळी हा दिवस भारतात विविध प्रकारे साजरा केला जातो. पवित्र अशा गंगा नदीत स्नान करणे, नदीत दीपदान करणे तसेच कुलदेवतेची पूजा करणे अशी पुण्य कार्ये या दिवशी केली जातात.
• देव दिवाळी या दिवशी बळीच्या राज्यातून श्रीविष्णू आपल्या मूळ स्थानी परत आल्याची पौराणिक कथा प्रचलित आहे.
• चातुर्मास्य समाप्तीनंतर विवाहाचे मुहूर्त निघायला सुरुवात होते. महाराष्ट्रात तुलसी विवाहाचे आयोजन केले जाते. ऊसाच्या दांड्या मंडप म्हणून उभ्या करतात आणि तुळस – बाळकृष्ण किंवा पूजेतील शाळीग्राम – तुळस असा विवाह लावला जातो.
• त्रिपुरासुराचा वध झाल्याने या दिवशी सर्व देवतांनी जल्लोष केला होता अशी पौराणिक कथा या निमित्ताने सांगितली जाते.
तुम्हाला देव दिवाळी म्हणजे काय (Dev Diwali Mhanje Kay) हा लेख कसा वाटला? तुमची काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा…