What is Detoxification ? शब्द ऐकलाय पण “डीटॉक्सीफिकेशन” म्हणजे नक्की काय?

डीटॉक्सीफिकेशन हा शब्द आपण खूप वेळा ऐकतो पण त्याचा नक्की अर्थ आपल्याला माहित नसतो. डीटॉक्सीफिकेशन म्हणजे एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे आपल्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर फेकली जातात. परंतु ही विषारी द्रव्य बाहेर टाकताना जर नैसर्गिक पद्धतीचा अवलंब केला तर जास्त फायदेशीर ठरते. त्याच्याविषयी घेतली जाणारी काळजी ही आपल्याला माहीत पाहिजे. आपण रोज खात असलेल्या अन्नामुळे किंवा प्रदूषित वातावरणामुळे आपल्या शरीरात खूप सारी विषारी द्रव्ये तयार होतात. या विषारी द्रव्य बाहेर फेकण्याचे काम लघवीद्वारे व घामाद्वारे केले जाते. तुम्ही जर खूप शारीरिक कष्ट करत असाल तर तुम्हाला डिटॉक्सीफिकेशनची गरज नसते. परंतु कामाचे स्वरूप जर बैठ्या स्वरूपात असेल तर मात्र तुम्हाला डीटॉक्सीफिकेशनची गरज आहे, नाहीतर काही कालांतराने तुमच्या शरीरात तीच विषारी द्रव्य साठून अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकते.

तुम्ही जर मद्य, चहा – कॉफी, सिगारेट जर जास्त प्रमाणात पित असाल तर विषारी द्रव्य खूप प्रमाणात शरीरात तयार होतात. शरीराच्या यंत्रणेत बिघाड होऊ शकतो. अशा पदार्थांचे सेवन न करणेच चांगले. शरीरातील विषारी द्रव्य बाहेर निघून जाण्यासाठी ६० ते ७० टक्के पातळ पदार्थ आणि फक्त ३० ते ४० टक्के घनपदार्थ घेणे गरजेचे असते हे करत असताना शरीरातील पाण्याची पातळी कायम राखणे गरजेचे आहे.

• कोणत्या पदार्थांचा करावा आहारात समावेश?

डीटॉक्सीफिकेशन करताना फळांचे सेवन उत्तम राहते. कलिंगड, पपई यासारख्या फळांचा रस ही चांगला असतो. तसेच हिरव्या पालेभाज्या कोबी फ्लावर देखील खावेत. जेवणात कांद्याचा समावेश केला तरी उत्तम. तसेच कोणत्याही फळांचा ज्यूस घेतल्यास फायद्याचे ठरते. म्हणजेच ताजी फळे, पालेभाज्या, ज्यूस लिंबूपाणी, नारळ पाणी, दही-ताक, मोड आलेली कडधान्य व भरपूर पाणी प्यावे. मल्टिव्हिटॅमिन पदार्थ टाळावेत.

डीटॉक्सीफिकेशन केव्हा करावे?
वर्षातून तीन ते चार वेळा डीटॉक्सीफिकेशन केलेले चांगले असते. तुम्हाला जर उच्च रक्तदाब किंवा मधुमेह याचा त्रास असेल तर दोन महिन्यातून देखील डीटॉक्सीफिकेशन करू शकता. डिटॉक्स करताना समतोल आहाराची गरज असते, नाहीतर अशक्तपणा येऊ शकतो. हे करताना तीन चार दिवस तरी जंक फूड्स, चरबीयुक्त आहार, साखर टाळावी.

• विषद्रव्ये तयार झालेली कशी कळतील ?

१ – वारंवार थकवा जाणवणे.

२ – अशक्तपणा येणे.

३ – स्वभावदोष निर्माण होणे.

४ – विनाकारण चिडचिड करणे.

५ – एकाग्रता कमी होणे.

६ – डोकेदुखी, अंगदुखी जाणवणे.

७ – त्वचाविकार उद्भवणे.

८ – पचनक्रिया बिघडणे.

ही सर्व कारणे जर तुम्हाला जाणवत असतील तर तुम्हाला डिटॉक्सीफिकेशनची खूप गरज आहे. फक्त तीन ते चार दिवसाच्या अनुभवानंतर तुम्ही खूपच फ्रेश अनुभव कराल.

• डीटॉक्सीफिकेशनचे फायदे –

१ – संपूर्ण चयापचय संस्थेत एकसंतता आणली जाते.

२ – रक्ताभिसरण सुधारते.

३ – नैसर्गिक ऊर्जा वाढते आणि पचन संस्थेची स्वच्छता होते.

४ – रक्त शुद्ध होते.

आहार हा आहारतज्ञांच्या मार्गदर्शनाने घ्यावा. तुमच्या प्रकृतीनुसार डॉक्टर योग्य ते मार्गदर्शन देतील. परंतु आहारात समावेश असणाऱ्या सर्व पदार्थात जास्त प्रोटीन असलेले, चरबीयुक्त पदार्थ टाळणे आवश्यक आहे.

(टीप – हा लेख पूर्णपणे संदर्भानुसार लिहिला आहे. तुम्ही डीटॉक्सीफिकेशन करताना आहार तज्ञाचा सल्ला अवश्य घ्या.)

Leave a Comment