गुडफ्रायडे – नक्की काय घडले या दिवशी?

ख्रिश्चन धर्मीय लोकांत गुडफ्रायडे हा दिवस अत्यंत शुभ व पवित्र समजला जातो. गुड फ्रायडे या दिवसाचं नक्की गुपित काय आहे आणि त्यामागे कोणतं रहस्य व कोणती घटना आहे ते आपण जाणून घेणार आहोत या लेखात…

ख्रिश्चन बांधव गुडफ्रायडे या दिवशी चर्चमध्ये जातात. प्रभू येशूंच स्मरण करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. गुडफ्रायडे या दिवशी ख्रिस्ती धर्मात सामाजिक कार्य देखील केले जाते. अशा पद्धतीने साजरा करण्यात येणारा हा दिवस काही विशिष्ट महत्त्व देखील ठेवतो.

काय घडले गुडफ्रायडे या दिवशी?

भगवान येशुंनी ज्या दिवशी मरण स्वीकारले म्हणजेच ज्या दिवशी त्यांना सुळावर चढवून मृत्यु देण्यात आला, तो दिवस शुक्रवार होता. त्याला गुड फ्रायडे असे संबोधले जाते कारण तो जरी आपल्याला हिंसात्मक दिवस वाटत असला तरी त्यामुळे प्रेम आणि शांतीचा संदेश संपूर्ण जगभरात पसरला गेलेला आहे.

प्रभू येशू ख्रिस्त यांना ज्यावेळी वधस्तंभावर खिळवण्यात आले त्यावेळी देखील त्यांच्या चेहऱ्यावर शांती झकळत होती. कोणत्याही प्रकारची वेदना आणि कष्ट त्यांच्या देहबोलीवरून जाणवत नव्हती. त्यांनी मृत्युला कवटाळत स्वतःच्या मारेकऱ्यांसाठी देखील “ईश्वरा यांना माफ कर, त्यांना माहीत नाही की ते काय करत आहेत” अशी प्रार्थना केली.

मरणयातना भोगत असतानाही त्यांनी मारेकऱ्यांसाठी प्रार्थना केली असल्याने ते ईश्वराचे पुत्र होते हे स्पष्ट होते. या घटनेनंतर मानवी इतिहासात येशू ख्रिस्त हे अत्यंत सकारात्मक प्रभाव सोडू शकले.

प्रभू येशू ख्रिस्त यांचा मृत्यू हा प्रेमपूर्ण आणि सकारात्मक भावनेने विश्वभरात ओळखला जावा यासाठी शुक्रवार या दिनाला “गुड फ्रायडे” किंवा “होली डे” असे संबोधले जाते.

काही ठिकाणी या दिनाला “ब्लॅक डे” असे देखील संबोधले जाते. येशू ख्रिस्त हे दैवी पुरुष असतानाही त्यांना वेदनादायक मृत्यु देण्यात आला. त्यामुळे बहुतांश लोक या दिवसाला “ब्लॅक डे” म्हणजे “काळा दिवस” मानतात.

गुडफ्रायडे या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त यांनी दिलेली शिकवण वाचली जाते. बायबलमधील वचने समजून घेण्याचा आणि अंगिकारण्याचा प्रयत्न केला जातो. चर्चमध्ये जाऊन मनोभावे प्रार्थना केली जाते. अशाप्रकारे गुड फ्रायडे हा दिवस अत्यंत शुभ भावनेने साजरा केला जातो.

Leave a Comment