Rahkeem cornwall

भारत आणि वेस्ट इंडीज संघामध्ये 2 टेस्ट मॅच ची सिरीज होणार असून त्यासाठी वेस्ट इंडीज संघाने आपला 13 जणांचा संघ जाहीर केला. तसेच या संघामध्ये आश्चर्यकारक रित्या ख्रिस गेल ला वगळण्यात आले असून त्याच्या जागी रहकीम कॉर्नवॉल नावाच्या खेळाडूला संघामध्ये स्थान देण्यात आले आहे.

रहकीम कॉर्नवॉल हा अँटिग्वा चा खेळाडू असून त्याचे वजन सुमारे 160 च्या आसपास आहे. एवढेच काय तर या प्लेअर ची उंची 6.8 फूट म्हणजे जवळजवळ 7 फूट इतकी आहे. जरी रहकिम हा शरीराने तंदरुस्त वाटत नसला तरी तो क्रिकेट खेळण्यात पटाईत असून उजव्या हाताने तो फलंदाजी व स्पिन गोलंदाजी करू शकतो. आपल्या ताकतीच्या जोरावर तो लांब फटके मारू शकतो व वेळ आल्यास स्पिन गोलंदाजी सुध्दा करू शकतो.

यासगळ्यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे वर्ल्ड कप नंतर ख्रिस गेल हा टेस्ट क्रिकेट मधून निवृत्ती घेणार होता पण विराट कोहलीच्या भारतीय संघाबरोबर टेस्ट मॅच खेळण्यासाठी त्याने निवृत्त होणे पुढे ढकलले होते पण अशातच त्याला वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने 13 जणांच्या संघात स्थान न देणे हा चर्चेचा विषय बनला आहे. तसेच त्याच्या ऐवजी रहकीम कॉर्नवॉलला संघात स्थान देण्यात आले आहे.

कॉर्नवॉल च्या संघातील स्थानाबद्दल वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाचे निवड समितीचे अध्यक्ष रॉबर्ट हायनेस म्हणाले की रहकीम हा सातत्याने चांगला खेळत असून त्याच्यात मॅच विनर बनण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्याला टीम मध्ये स्थान देणे वेस्ट इंडिज संघाला फायदेशीर ठरू शकते.

वेस्ट इंडिज टीम – जेसन होल्डर (कर्णधार), क्रैग ब्रेथवेट, डेरेन ब्रावाे,ब्रुक्स,जॉन कॅम्पबेल, रोस्तोन चेस,रहकीम कॉर्नवॉल ,शेन डाउरीच (विकेटकीपर),शांनोन गब्रियल, शिमरोन हेटमायार ,शाई होप,कीमो पौल,केमार रोच अशी 13 जणांची टीम वेस्ट इंडीज संघाने भारताविरुद्ध होणाऱ्या टेस्ट मालिकेसाठी निवडली असून प्रेक्षकांना नक्कीच ख्रिस गेल ची कमतरता नेहमी भासत राहील एवढं नक्की!

ही सहा नावे आहेत टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here