मेडिक्लेम पॉलीसीचे प्रकार | Types Of Mediclaim Policy in Marathi |

सध्या आरोग्य विमा अत्यंत गरजेचा झालेला आहे. आरोग्य विम्याचे विविध प्रकार देखील विमा कंपन्या सादर करीत आहेत. त्या प्रकारांची सर्वांना माहिती असणे आवश्यक असल्याने प्रस्तुत लेखात आरोग्य विम्याचे प्रकार (मेडिक्लेम पॉलीसी – Types Of Mediclaim Policy) स्पष्ट करण्यात आलेले आहेत.

आरोग्य विमा प्रकार | Types Of Mediclaim Policy in Marathi |

१. वैयक्तिक आरोग्य विमा –

वैयक्तिक आरोग्य विमा प्रकारात फक्त एका व्यक्तीस रुग्णालय खर्च भरपाई मिळू शकते. या विम्याचा वार्षिक हफ्ता (प्रीमियम) व्यक्तीचे वय, वैद्यकीय इतिहास आणि विम्याच्या भरपाई रकमेनुसार ठरवला जातो. अतिरिक्त प्रीमियम भरून तुम्ही अन्य व्यक्तीला देखील या विम्याचा लाभ मिळवून देऊ शकता.

२ – कौटुंबिक आरोग्य विमा –

स्वतःबरोबर जर इतर कुटुंबीय सदस्यांना आरोग्य विम्याचा लाभ देऊ इच्छिता तर तुम्ही कौटुंबिक आरोग्य विमा निवडू शकता. मुले, पालक आणि इतर नातेवाईकांचा या पॉलिसीमध्ये समावेश असू शकतो.

एकाच प्रीमियमवर ही मेडिक्लेम पॉलीसी काढू शकतो आणि या प्रीमियमची किंमत देखील कुटुंबातील व्यक्तींच्या वयानुसार ठरत असते. आपल्या कुटुंबात जास्त वयस्कर व्यक्ती नसतील तर ही योजना लाभदायक ठरते कारण प्रीमियम एकदम रास्त भरावा लागतो आणि भरपाई खर्च देखील व्यवस्थित मिळतो.

३ – गट आरोग्य विमा –

गट आरोग्य विमा हा एखादी संस्था किंवा कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी काढला जातो. या पॉलिसीत मर्यादित रकमेपर्यंत लाभ मिळतो व सदस्य संख्या जास्त असते. या विम्यात मिळणारा भरपाई खर्च हा व्यक्तिगत स्तरावर तेवढासा लाभदायक नसतो त्यामुळे गटविमा असला तरी वैयक्तिक आरोग्य विमा काढणे फायदेशीर ठरतो.

ज्या गटातर्फे हा विमा काढला असेल तो गट किंवा ती संस्था सोडल्यावर मेडिक्लेम मिळत नाही. त्यामुळे गटविम्यावर जास्त अवलंबून न राहता वैयक्तिक विमा काढायलाच हवा.

४. डेली कॅश बेनिफिट पॉलिसी (प्रत्येक दिवसासाठी रक्कम)

या पॉलिसी प्रकारात आपल्याला भरपाई खर्च म्हणून प्रत्येक दिवसासाठी रक्कम मिळत असते. पॉलिसी काढताना एक मोठी रक्कम निश्चित केली जाते त्या रकमेपर्यंत दररोज काहीशी रक्कम तुम्हाला प्रदान केली जाते.

या विम्याचा मूळ उद्देश्य असा की, रुग्णालयातील अतिरिक्त एका दिवसाचा खर्च हा त्याचवेळी देता यावा. तसेच या प्रकारच्या विम्याने एकूण खर्च परवडतो आणि भरपाई खर्च मिळणाऱ्या वेळेची बचत देखील होते.

५. गंभीर आजार विमा (Critical Illness)

कोणत्याही विमा योजनेत अगोदरच आजार निश्चित केलेले असतात परंतु काहीवेळा जीवघेणा दुसराच आजार उद्भवल्यास त्यावेळी रुग्णाला उपचारासाठी अतिरिक्त दिवस दवाखान्यात काढावे लागतात तेव्हा वाढीव खर्च होतो.

अशा अवघड परिस्थितीत या गंभीर आजार विम्याचा लाभ होऊ शकतो. त्यामुळे मानसिक त्रास देखील कमी होतो आणि आर्थिक नुकसान देखील वाचते.

६. वरिष्ठ नागरिक आरोग्य विमा योजना –

वृद्ध लोक आजारी पडण्याची शक्यता जास्त असल्याने हा वरिष्ठ नागरिक आरोग्य विमा काढणे फायदेशीर ठरते. वृद्ध लोकांसाठी उपचाराचा खर्च हा न परवडणारा असतो. त्यांचा वैयक्तिक विमा काढण्याऐवजी वरिष्ठ नागरिक आरोग्य विमा काढला तर त्यांच्या आजारांच्या खर्चाची अतिरिक्त भरपाई मिळते.

वरिष्ठ आरोग्य विमा काढण्यासाठी व्यक्तीचे वय 60 वर्षे पूर्ण असावे लागते.

तुम्हाला आरोग्य विम्याचे (मेडिक्लेम पॉलीसी) प्रकार (Types Of Mediclaim Policy) हा लेख महत्त्वपूर्ण वाटल्यास नक्की तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये कळवा….

Leave a Comment