तुळस _ मराठी माहिती • Tulas Mahiti Marathi •

प्रस्तुत लेखात तुळस (Tulas) या बहुपयोगी वनस्पतीविषयी माहिती सांगितलेली आहे. तुळस या वनस्पतीचे महत्त्व लक्षात घेता आपल्याला त्याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. चला तर मग पाहुयात तुळस वनस्पतीची माहिती!

तुळस माहिती मराठी _ Basil Information in Marathi

• तुळस वनस्पतीचे शास्त्रीय नाव ऑसिमम सॅंक्टम (Ocimum sanctum) आहे तर इंग्रजी भाषेत तुळशीला बेसिल (Basil) असे संबोधतात. तुळस ही पुदिन्याच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे.

• तुळशीची रोपे आशिया, आफ्रिका व युरोप या खंडांमध्ये आढळतात. तुळशीची उंची साधारणतः ३० ते १२० सेमी एवढी असते.

• तुळशीची पाने लंबगोलाकार व टोकदार असतात. तुळशीची पाने खोकला आणि घशाच्या आजारांवर अत्यंत गुणकारी असतात.

• तुळशीच्या फुलाला मंजिरी म्हणतात. फुलांमध्येच तुळशीच्या बिया आढळतात. त्यापासून संगुधी तेल देखील बनवले जाते.

• तुळस वनस्पतीपासून जास्तीत जास्त ऑक्सिजन सोडला जातो. त्यामुळे भारतात तरी प्रत्येक घरासमोर तुळस असणे हे अत्यंत पवित्र आणि मांगल्याचे समजले जाते.

• भारतीय स्त्रिया देवदेवतांचे पूजन करून झाल्यावर तुळशीची सुद्धा पूजा करतात. सण समारंभ असल्यास पहाटे पहाटे तुळशीला पवित्र पाणी वाहिले जाते.

• तुळशीची माळ परिधान करणे, तुळशीचे लग्न लावणे, तुळशीचा काढा पिणे, व्यक्तीच्या मृतदेहावर तुलसीपत्र ठेवणे अशा विविध प्रथा तुळशी संबंधी प्रसिध्द आहेत. तसेच सकाळी व सायंकाळी तुळशीपुढे धूप – अगरबत्ती व दिवाही लावला जातो.

• तुळस ही थोडी कडवट चवीची असते. शारिरीक रोगराई व विविध प्रकारच्या कीटकांच्या प्रादुर्भावामध्ये तुळशीची पाने उपयोगी ठरतात.

तुळशीचे प्रकार –

विविध प्रदेशांतील तुळशीच्या जातींवरून तुळशीचे प्रकार पडलेले आहेत. औषधी तुळस, कापूर तुळस, लवंग तुळस, काळी तुळस, कृष्ण तुळस, रान तुळस असे तुळशीचे प्रकार प्रामुख्याने सांगता येतील.


तुम्हाला तुळस – मराठी माहिती (Tulas Marathi Mahiti) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment