आज ९ सप्टेंबर दिवशी अनंत चतुर्दशी असून या दिवशी भगवान विष्णू आणि गणपतीची आराधना केली जाते. आजच्या दिवशी घरगुती आणि सार्वजनिक गणपतीला निरोप दिला जातो. त्यानिमित्ताने अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते.
गणेश चतुर्थीला गणपतीचे आगमन होत असते तर अनंत चतुर्दशीला गणपती देवाला निरोप दिला जातो. गणेशाची या दहा दिवसांत होणारी स्थापना ही प्रत्येकाच्या घरी भक्तिमय वातावरण तयार करत असते.
गणपती विसर्जन करताना त्याची मनोभावे आरती केली जाते. स्थापलेल्या जागेवरून मूर्ती उचलून घेऊन वाहत्या पाण्यात किंवा साठलेल्या पाण्यात विसर्जित केली जाते. सार्वजनिक गणपतीची मिरवणूक देखील काढली जाते.
गणपतीचा जयघोष सर्वत्र केला जातो. एकमेकांना गणपती विसर्जनाच्या शुभेच्छा दिल्या जातात. गणपतीचा प्रसाद हा मिरवणुकी दरम्यान सर्वांना दिला जातो.
अनंत चतुर्दशी शुभेच्छा संदेश | Anant Chaturdashi Wishes|
“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!”
एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार, पाच सहा सात आठ, गणपतीचा थाटमाट, नऊ दहा अकरा बारा गणपतीची आरती करा.
Happy Anant Chaturdashi, May this Day brings the light, joy & happiness in your life.
सर्वांच्या जीवनात गणपतीचे आशीर्वाद लाभोत, सर्वांना सुख समृद्धी प्राप्त होवो. अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!