वाघ – मराठी माहिती | Tiger Information In Marathi |

वाघ हा प्राणी अत्यंत क्रूर, शूर आणि धूर्त प्राणी आहे. तो काहीजणांना फक्त दिसण्यावरून आवडतो कारण वाघाचा प्रत्यक्ष सहवास करायला कुठलाच व्यक्ती धजवणार नाही. प्रस्तुत लेखात वाघाबद्दल मराठी माहिती (Tiger Information in Marathi) देण्यात आलेली आहे.

वाघ माहिती मराठीमध्ये | Wagh Marathi Mahiti |

वाघ हा वेगवान, शूर, आकर्षक आणि मांसाहारी वन्य प्राणी आहे. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून याची गणना होते.

भारत, बांगलादेश, थायलंड, रशिया, इंडोनेशिया, आणि नेपाळमध्ये बहुतेक वाघ आढळतात. वाघ हा व्याघ्र या संस्कृत शब्दापासून तयार झाला आहे. वाघाचे वैज्ञानिक नाव पँथेरा टायग्रीस तर इंग्रजीमध्ये त्याला Tiger (टायगर) असे म्हणतात.

वाघाच्या एकूण 9 प्रजाती होत्या. त्यापैकी 3 प्रजाती आता पूर्णपणे नामशेष झालेल्या  आहेत. भारतात आढळणार्‍या वाघाची प्रमुख प्रजाती म्हणजे ‘रॉयल ​​बंगाल टायगर’ आहे.

वाघाला ‘धोकादायक’ प्रजाती म्हणून 1986 पासून वर्गीकृत केले गेले आहे. सध्या जगभरात जास्तीत जास्त 3950 वाघ आहेत, त्यापैकी 75% पेक्षा जास्त वाघ फक्त भारतात आढळतात.

पूर्वी वाघाची शिकार करणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जायचे. त्यामुळे सध्या शिकार व वाढती मानवी वसाहत यांमुळे वाघांची संख्या फारच कमी झाली आहे. प्राचीन काळापासून वाघाला ऐतिहासिक महत्त्व आहे. विविध धर्म आणि पंथांमध्ये वाघाचे चिन्ह प्रदर्शित केलेले असते.

जगभरातील विविध देशांत सांस्कृतिक, कला – क्रीडा व धार्मिक कार्यक्रमात वाघाची प्रतिमा प्रतिकात्मक स्वरूपात वापरलेली असते. अनेक संघटनांच्या ध्वजांमध्ये वा चिन्हांमध्ये वाघाचा प्रामुख्याने समावेश असतो.

वाघाची शरीर रचना :

वाघाच्या शरीरावर काळे पट्टे असतात. झुडूपांमध्ये लपून राहण्यास हे काळे पट्टे उपयोगी पडतात, ज्यामुळे शिकार करताना वाघांना मदत होते. त्याचे दात आणि पंजे हे तीक्ष्ण असतात ज्यामुळे शिकार पकडण्यास आणि मांस खाण्यास त्याला मदत होते.

वाघाच्या शरीराचे अंतर्गत भाग जसे की वक्ष आणि पाय पांढऱ्या रंगाचे असतात. वाघ एक रुंद, उंच आणि वजनी प्राणी आहे. वाघाचे वजन 300 किलोग्रॅम पर्यंत असू शकते आणि त्याची उंची 6 – 7 फूट लांब वाढू शकते.

वाघाची जीवनपद्धत –

वाघ हा गवताळ प्रदेशात, ओलसर, ओलांडलेल्या जंगलांमध्ये राहणे पसंत करतात. ते जास्त प्रमाणात तृणभक्षक प्राण्याची शिकार करतात. म्हणून वाघ गवताळ प्रदेशात राहणे पसंत करतो. 

वाघ हा एक पूर्ण मांसाहारी प्राणी आहे व तो सिंहाप्रमाणे इतर शाकाहारी प्राण्यांची शिकार करतो. वाघाची दृष्टी आणि गंध घेण्याची क्षमता चांगली असते. त्यामुळे त्याला शिकार करताना अडचण येत नाही.

वाघ विशेषत: वेग, चपळता, आणि शिकार करण्याची क्षमता यासाठी ओळखला जातो. वाघ हा कितीही वेगाने धावत असला तरी तो फार लांब पळण्यास सक्षम नसतो. म्हणूनच तो अचानक छापे टाकून किंवा चोरी करून  शिकार करतो.

२१व्या शतकात वाघांची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे वाघांच्या संरक्षणासाठी सरकारी योजना आणि धोरणे तयार केली जातात.

लेखन सौजन्य – प्रिती पवार

तुम्हाला वाघ मराठी माहिती (Tiger Information In Marathi) हा लेख आवडल्यास तुमचे मत नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा.

Leave a Comment