ऍशेस कसोटी रंगतदार स्थितीत _ ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड _

Latest Marathi News | Daily Marathi News |

दिनांक – ०२ जुलै २०२३

ऍशेस कसोटी अगदीच रंगतदार अवस्थेत पोचलेली आहे. ऍशेस कसोटीत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात २७९ धावांवर बाद झाल्याने इंग्लंडसाठी ३७१ धावांचे लक्ष्य प्राप्त झाले. पहिल्या डावाच्या ९१ धावांची आघाडी ऑस्ट्रेलियाकडे होती.

ऑस्ट्रेलियन दुसऱ्या डावात उस्मान ख्वाजाने सर्वाधिक ७७ धावा काढल्या तर इंग्लंडतर्फे स्टुअर्ट ब्रॉडने सर्वाधिक ४ बळी टिपले. ३७१ धावांचे लक्ष्य घेऊन इंग्लंडचा डाव सुरू झाला परंतु बेन डकेट वगळता आघाडीच्या फलंदाजांनी साफ निराशा केली. एकवेळ इंग्लंडची धावसंख्या ४५/४ अशी बिकट होती.

त्यानंतर बेन स्टोक्स आणि डकेट यांनी मिळून ६९ धावांची भागीदारी केली आणि सामन्यात प्राण फुंकले. बेन स्टोक्स हा २९(६६) तर डकेट ५०(६७) अशा धावांवर नाबाद आहेत. इंग्लंडसाठी सामन्याची संपूर्ण मदार या जोडीवर असणार आहे.

दिवसाखेर इंग्लंडची धावसंख्या ११४/४ अशी सन्मानजनक अवस्थेत येऊन पोचली होती. या डावात ऑस्ट्रेलियातर्फे स्टार्क आणि कमिन्स यांनी प्रत्येकी दोन बळी घेतलेले आहेत.

सामन्याचा शेवटचा दिवस हा अति रंगतदार असणार आहे. इंग्लंडला जिंकण्यासाठी २५७ धावांची गरज आहे तर ऑस्ट्रेलिया लवकरात लवकर ६ बळी घेण्याचा प्रयत्न करेल. इंग्लंड फलंदाजीत जॉनी बेयरस्टो हा सर्वात महत्त्वाचा खेळाडू असणार आहे.

संक्षिप्त धावफलक –

ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) – ४१६/१०
इंग्लंड (पहिला डाव) – ३२५/१०

ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) – २७९/१०
इंग्लंड (दुसरा डाव)* – ११४/४ (३१)

Leave a Comment