सुपर 30 ही गणितज्ञ आनंद कुमार यांची कथा आहे जी आयआयटीच्या प्रवेश परीक्षेसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करते.
रितिक रोशन अभिनीत सुपर 30 चा ट्रेलर काल प्रदर्शित झाला. ट्रेलर च्या प्रदर्शनानंतर लगेचच ट्रेलर ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. साडेतीन मिनिटांचा ट्रेलर गणितज्ञ आनंद कुमार यांच्या शिक्षकांपासूनचा प्रवास दाखवतो तसेच आर्थिक कमकुवत विध्यार्थ्यांना शिकवताना दाखवलं गेलं आहे.
आयआयटीच्या इच्छेने आर्थिकदृष्ट्या कमकुवत पार्श्वभूमी असलेल्या मुलांना गणित शिकवताना ह्रितिक ह्या सिनेमात दिसेल. या चित्रपटात तो सावळ्या रंगात आणि बिहारी भाषा बोलताना दिसतो यावरून त्याची मेहनत या चित्रपटात दिसते. ब्राउनफेस मधील ऋतिक रोशन आनंद कुमारची भूमिका करताना कुठेही कमी पडलेला दिसत नाही. ह्रितिक रोशनने सोशल मीडियावर ट्रेलर ची लिंक देऊन लिहले आहे कि, ‘सर्व सुपरहिरो कॅप्स घालत नाहीत.’
सुपर 30 मध्ये मृणाल ठाकूर, नंदीश सिंग आणि पंकज त्रिपाठी यांची सुद्धा भूमिका महत्त्वाची आहे.
सुपर 30 ने फिल्मच्या रिलीझ डेट आणि दिग्दर्शक क्रेडिट्सबद्दलच्या विवादास्पद भागाचा वाद मिटवला आहे. सुपर 30 ची रिलीज डेट जानेवारी 2019 मध्ये फिक्स झाली होती परंतु ही रिलीझ डेट 26 जुलैला स्थगित करण्यात आली. गेल्या महिन्यात कणना राणावत आणि राजकुमार राव यांची भूमिका असलेल्या मेंटल है क्या च्या निर्मात्यांनी घोषित केले की त्यांची फिल्म 26 जुलै ला प्रकाशित होईल त्यामुळे सुपर 30 ची प्रकाशन तारीख 12 जुलै ला करण्यात आली.
दरम्यान, विकास बहल यांचे #मी टू आरोपांमध्ये नाव आले होते तेव्हा त्यांचे दिग्दर्शन श्रेय फिल्ममधून वगळण्यात आले होते. आठवड्याच्या अखेरीस, रिलायन्स एंटरटेनमेंट, जे सह-प्रोड्युसर सहकारी आहेत, त्यांनी यासर्वांवर पडदा टाकून त्यांना क्लीन चिट दिली.
सुपर 30 हा फॅंटम फिल्म बॅनरच्या अंतर्गत पहिला चित्रपट आहे, जो गेल्या वर्षी विकास बहलच्या #मी टू विवादानंतर मोडला होता.