प्रस्तुत लेखात सेन्सेक्स आणि निफ्टीबद्दल माहिती (Sensex and Nifty Information in Marathi) देण्यात आलेली आहे. प्रत्येक गुंतवणूकदारास या दोन्ही बाबींची मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे.
सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय? Sensex and Nifty In Marathi?
सेन्सेक्स म्हणजे काय, निफ्टी म्हणजे काय, सेन्सेक्स आणि निफ्टी मराठी माहिती, सेन्सेक्स आणि निफ्टी अर्थ, असे विविध keywords सध्या प्रचलित आहेत.
त्याद्वारे नेटकरी शेअर बाजारमधील सेन्सेक्स आणि निफ्टीविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. चला तर मग जाणून घेऊयात काय आहे Sensex आणि Nifty?
सेन्सेक्स म्हणजे काय? Sensex Meaning in Marathi
सेन्सेक्सची स्थापना १८७५ मध्ये झाली. सेन्सेक्स हा निर्देशांक बॉम्बे (मुंबई) स्टॉक एक्सचेंज (बीएसई) प्रतिबिंबित करतो. शेअर मार्केट विश्लेषक दिपक मोहोनी यांनी सर्वप्रथम सेन्सेक्स हा शब्द प्रचलित केला होता.
सेन्सेक्सचा विस्तृत अर्थ म्हणजे सेन्सिटिव्ह इंडेक्स! बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला जानेवारी १९८६ पर्यंत कोणताही अधिकृत निर्देशांक नव्हता. सेन्सेक्सने तेव्हा भारतीय बाजाराची कामगिरी पाहिली आणि निर्देशांक दिला गेला.
सेन्सेक्समध्ये सक्रियपणे व्यापार करणाऱ्या 30 समभागांचा समावेश असतो. भारतीय शेअर बाजाराच्या हालचाली सेन्सेक्समध्ये प्रतिबिंबित होत असतात. सेन्सेक्स मुल्यात वाढ किंवा घट झाल्यास शेअर्सच्या किंमतीत वाढ किंवा घट होत असते.
भारतीय अर्थव्यवस्थेतील एकूण चढ-उतार, उद्योगांचा विकास आणि स्वतःचा होणारा नफा पाहण्यासाठी गुंतवणूकदार सेन्सेक्स या भारतातील सर्वात जुन्या स्टॉक इंडेक्सचा उपयोग करतात.
निफ्टी म्हणजे काय? Nifty Meaning In Marathi |
एनएसई हे भारतातील अग्रगण्य स्टॉक एक्सचेंज आहे. या स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक म्हणून निफ्टी या इंडेक्सचा वापर होतो. निफ्टीची निफ्टी – 50 किंवा सीएनएक्स निफ्टी म्हणून सुद्धा ओळख आहे.
नॅशनल आणि फिफ्टी या दोन्ही शब्दांपासून निफ्टी हा शब्द तयार झालेला आहे. निफ्टी हा इक्विटी बेंचमार्क इंडेक्स आहे जो 1996 मध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (एनएसई) सुरू केला होता.
निफ्टीमध्ये सक्रियपणे व्यापार करणाऱ्या 50 समभागांचा समावेश असतो. सेन्सेक्सच्या तुलनेत अधिक समभाग असल्याने सेन्सेक्सपेक्षा निफ्टी अधिक वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे बीएसईच्या तुलनेत एनएसईमध्ये जास्त व्यापार होताना दिसून येतो.
तुम्हाला सेन्सेक्स आणि निफ्टी – मराठी माहिती (Sensex and Nifty in Marathi) हा लेख आवडल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…