संकष्टी चतुर्थी – मराठी माहिती | Sankashti Chaturthi Mahiti Marathi

संकष्टी चतुर्थी म्हणजे काय, त्याचे महत्त्व, आणि व्रत अशा विविध बाबींचे वर्णन या संपूर्ण लेखात केलेले आहे. चला तर मग पाहुयात संकष्ट चतुर्थी विषयी मराठी माहिती…

संकष्टी चतुर्थी म्हणजे काय | Sankashti Chaturthi Mhanje kay

√ कृष्ण पक्षातील चतुर्थीस संकष्टी किंवा संकष्ट चतुर्थी असे म्हणतात. संकष्टी चतुर्थीला ‘संकटहार चतुर्थी’ असे देखील म्हणतात.

√ संकष्टीला गणपतीची पूजा केली जाते. या दिवशी व्रत – उपवास केले जातात ज्यामध्ये चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व असते.

√ एका वर्षात १२ संकष्टी असतात आणि जर अधिकमास असेल तर १३ संकष्टी चतुर्थी असतात.

√ श्री गणेशाला हा दिवस समर्पित केला जातो. या दिवशी श्री गणेशाची मनोभावे उपासना केली जाते.

संकष्टी चतुर्थीचे व्रत / उपवास –

√ संकष्टी चतुर्थीला श्री गणेश देवाची पूजा करण्याचे महत्त्व आहे. श्री गणेशमूर्ती पूजन करून मोदक, कलश – श्रीफळ त्यासमोर ठेवणे तसेच पूजेचे सर्व साहित्य जसे की पाचपालवी, पाच धान्ये, हळदी – कुंकू, फुले, स्वच्छ पाणी अशी पूजेची मांडणी करावी.

√ गणपतीचे पूजन करताना अथर्वशीर्षाचे पठण केले जाते.

√ संकष्टीला अगदी कडक उपवास पकडण्याचे नियम आहेत. दिवसभर काहीही ग्रहण न करता रात्री चंद्रदर्शन करून गणपतीला नैवेद्य दाखवणे आणि उपवास सोडणे.

√ स्त्री आणि पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात. या व्रताचा काल हा आमरण असतो. काहीजण हे व्रत एकवीस वर्ष करतात तर काहीजण एकवर्ष हे व्रत पकडतात.

√ संकष्टीला व्रत पकडल्यावर व्रतकथा ऐकणे किंवा वाचणे हा नियम आहे.

√ जी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हटले जाते. अधिक मासातील अंगारकी चतुर्थी ही एकवीस वर्षांतून एकदाच येते.

√ श्री गणेश ही बुद्धीची देवता असल्याने आपल्याही जीवनात बुद्धीची प्रगल्भता यावी यासाठी संकष्टीला व्रत पकडले जाते. तसेच जीवनातील विघ्ने दूर होऊन आनंदप्राप्ती व्हावी अशी इच्छा ठेवली जाते.

तुम्हाला संकष्टी चतुर्थी – मराठी माहिती (Sankashti Chaturthi Mahiti Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment