पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांचे मराठी साहित्यातील योगदान अनमोल आहे. प्रसिध्द लेखक, स्वातंत्र्यसेनानी, समाजसेवक अशा विविध कार्यांनी आपले जीवन कृतार्थ ठरवणारे साने गुरुजी यांचे विचार (Sane Guruji Marathi Suvichar) प्रस्तुत लेखात देण्यात आलेले आहेत.
साने गुरुजी सुविचार | Sane Guruji Quotes In Marathi |
“एका ध्येयाने बांधलेले कोठेही गेले तरी ते जवळच असतात.“
साने गुरुजी
“स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी.“
साने गुरुजी
“आपले मन म्हणजे एक महान जादुगार व चित्रकार आहे, मन म्हणजे ब्रह्मसृष्टीचे तत्त्व आहे.“
साने गुरुजी
“जिकडून जे घेता येईल, ज्यांच्यापासून जे शिकता येईल, ते आदराने घ्या.“
साने गुरुजी
“दुसऱ्याला हसणे फार सोपे असते पण दुसऱ्या करिता रडणे फार कठीण असते, त्याला अंत:करण असावे लागते.“
साने गुरुजी
“करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे.“
साने गुरुजी
“आईचे प्रेम जिथे असेल ती झोपडी राज राजेश्वरीच्या ऐश्वर्यालाही लाजवील, हे प्रेम जिथे नाही ते महाल व दिवाणखाने म्हणजे स्मशानेच होत.“
साने गुरुजी
“कला म्हणजे परमोच्च ऐक्य.“
साने गुरुजी
किर्ती हे उद्याचे सुंदर स्वप्न आहे, पण पैसा ही आजची भाकर आहे.
साने गुरुजी
“जगात कोणीही संपूर्ण स्वतंत्रपणे सर्व ज्ञान शोधून काढले आहे असे नाही.“
साने गुरुजी
“आजकाल जगात भलत्याच गोष्टींना महत्त्व आले आहे, वास्तविक ज्या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे त्यांना कोणीच देत नाही, मुख्य महत्त्व माणुसकीला आहे.“
साने गुरुजी
“कला म्हणजे सत्य, शिव आणि सौंदर्य यांचे संमेलन.“
साने गुरुजी
“जुन्या जीर्ण शीर्ण रूढी आज कशा चालतील? लहानपणीचा अंगरखा मोठेपणी मुलाला कसा होईल?“
साने गुरुजी
“ज्ञान म्हणजे ध्येयासाठी शून्य होणे, ज्ञान म्हणजे चर्चा नव्हे, वादही नव्हे आणि देह कुरवाळणे म्हणजे ज्ञानही नव्हे, ध्येयासाठी देह हसून फेकणे म्हणजे ज्ञान.“
साने गुरुजी
“ज्यांच्या भावना कशानेही हेलावत नाहीत, ती काय माणसे म्हणायची?“
साने गुरुजी
“जे सत्य असते ते काळाच्या ओघात टिकते, असत्य असते ते अदृश्य होते.“
साने गुरुजी
“ध्येय जितके महान तेवढा त्याचा मार्गही लांब व खडतर असतो.“
साने गुरुजी
“ध्येय सदैव वाढतच असते.“
साने गुरुजी
“निर्बलांना रक्षण देणे हीच बळाची खरी सफलता होय.“
साने गुरुजी
“निसर्गावर प्रेम करा, निसर्ग आपली माता आहे.“
साने गुरुजी
“भेदावर अभेद हेच औषध आहे.“
साने गुरुजी
“प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात दु:ख असते. दु:ख गिळून आनंदी राहणे हीच खरी माणुसकी.“
साने गुरुजी
“प्रेमाचे नाते सर्वात थोर आहे.“
साने गुरुजी
“भूतकाळातील काही गोष्टी आता चुकीच्या वाटल्या तर त्या दूर न करणे म्हणजे भूतकाळाचा अपमान आहे. भूतकाळातील भ्रामक गोष्टी जर तशाच पुढे चालवू तर ते उचित नाही. तो भूतकाळाचा गौरव नाही. तो पूर्वजांचा गौरव नाही. उलट त्या थोर पूर्वजांचा अपमान करण्यासारखे आहे.“
साने गुरुजी
“मेघ सारे पाणी देऊन टाकतात, झाडे फळे देऊन टाकतात, फुले सुगंध देऊन टाकतात, नद्या ओलावा देऊन टाकतात, सुर्य चंद्र प्रकाश देतात. जे जे आहे ते ते सर्वांनी मिळून उपभोग घेऊ.“
साने गुरुजी
“मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनीच मनुष्य शोभतो.“
साने गुरुजी
“सदाचार हा मनुष्याचा खरा अलंकार आहे.“
साने गुरुजी
“सूर्याच्या किरणांनी ज्याप्रमाणे बर्फाच्या राशी वितळतात, त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या ओलाव्याने वितळतात.“
साने गुरुजी
“हृदयात अपार सेवा भरली की सर्व मित्रच दिसतात.“
साने गुरुजी
साने गुरुजी हे थोर व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे विचार सद्य आणि भावी पिढीला प्रेरक ठरतील असेच आहेत. तुम्हाला जर साने गुरुजी यांचे सुविचार (Sane Guruji Marathi Suvichar) आवडले असतील तर तुमचा अभिप्राय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा…