अप्रतिम प्रेम संदेश! Marathi Quotes on Love |

प्रेम ही भावनाच विलक्षण आहे. तिचा अनुभव घेतल्याशिवाय कोणीही सांगू शकत नाही की प्रेम काय आहे…संपूर्ण लेखात अशा या प्रेमाचे संदेश (Love Quotes In Marathi) समाविष्ट करण्यात आलेले आहेत.

आज सर्वत्र मोबाईल आणि सोशल मीडियाचा प्रभाव आहे. सर्वजण आपल्या सर्व भावना चॅटिंग करूनच व्यक्त करत असतात. प्रेमाचे हितगुजही चॅटिंगद्वारे होत असते. त्यामुळे तुम्हालाही जर तुमच्या प्रिय व्यक्तींना प्रेमाबद्दल संदेश पाठवायचे असतील तर तुम्ही या लेखातील संदेश पाठवू शकता.

हा लेख वाचल्यावर तुमची प्रेम भावना आणखी खोल जाणिवेने बहरून जाईल आणि तुम्हाला प्रेममय करून जाईल, अशी आशा करतो.

Love Quotes In Marathi | Marathi Quotes On Love |

हृदयाने प्रेम जाणावे तर बुद्धीने प्रेमाची समज निर्माण करावी!
🌺❤️

जेव्हा दोन शांत मने एका विलक्षण प्रेममय अनुभूतीने भारावलेली असतात, त्यानंतर त्यांना विरहाचे क्षण असह्य होत जातात.
❤️🧡💛

दोन प्रेमी असूद्या किंवा कोणत्याही नात्यातील प्रेम असूद्या, व्यक्तीची हृदयातील सुखद अनुभूती हेच खरे प्रेम आहे.
💞♥️

देहापासून सुरुवात होईल पण प्रेमाचे आकर्षण देहापलिकडे आहे.
💕❤️🧡

प्रेमाची संवेदना वेळ आणि स्थान यांच्या पलिकडे जाणवते.
🧡💕🧡

दोन प्रेमी एकत्र आल्यावर अनामिक नात्याची गाठ बांधली जाते.
🌺💞😍🌺

अश्रू पुसताना तिचे…
स्पर्श आणखी हळुवार होत गेला…
विरहाचे असे क्षण सहन होत नव्हते…
जाणवत होते ते मला.
✔️💞

वेळ वाया नाही गेला तर उपयोगात आला हा अनुभवच प्रेमात अविरत टिकून राहतो.
💞💕💕

साठवलेले भावनिक बंध कोणासोबत तरी जोडले जाणे म्हणजे प्रेम!
😍

खोट्या कथा आणि कल्पना प्रेमामध्येच खऱ्या वाटू शकतात तथापि आपण त्या खऱ्या वाटून घेतलेल्या असतात.
💐😍💐

नात्यात दाखवलेला संयम आणि नात्यासाठी केलेली वेळेची गुंतवणूक याच गोष्टी प्रेम टिकवून ठेवतात.
❤️🌺🧡😍

नात्यात कर्म नाही तर हृदयातील प्रेम तोलले जावे.
🥰❤️🌺

प्रेम सर्वांवर असते नाहीतर कोणावरही नसते. प्रेम हा स्वतःचा स्वभाव आहे. कोणा एका व्यक्तीवर तो अवलंबून नसतो.
💗💓

स्वार्थी प्रेम दुसऱ्याचा वापर करते आणि निःस्वार्थ प्रेम दुसऱ्याला स्वतंत्र करते.
❣️

मन फक्त दिशा निश्चित करते. त्यानंतर प्रेमाचा किंवा अहंकाराचा असे दोन प्रकारचे प्रवास घडतात.
💕💞❣️

भावनाशील व्यक्ती प्रेम निवडते तर तर्कयुक्त व्यक्ती ज्ञान निवडते.
❤️💓💞

मनुष्याची अस्मिता प्रेम आहे. अंतिम विकास देखील प्रेमच आहे.
🌺❣️

संवेदनशील मनुष्यच प्रेम करू आणि अनुभवू शकतो. कारण प्रेमात स्वभावातील कोमलता आवश्यक असते.
💓💞

प्रेम ही आंतरिक अनुभूती आहे. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीची उपस्थिती फक्त त्या अनुभूतीची जाणीव करून देऊ शकते.
💞💕

प्रेम एक स्वतंत्रता आहे. तुम्ही स्वतंत्रता देऊन पाहा, तुम्हीही हळूहळू स्वतंत्र आणि मुक्त अनुभव करू शकाल.
♥️💗💕

मला जाणवलेले विस्मयकारक डोळे तिचे आजही आठवण करून देतात…
मुक्त सुगंधित क्षणांची, मंद मंद वाऱ्याची, अखंडित श्र्वासाची आणि स्व हरवून गेल्याची…
🌺💞🌺🥰

तुम्हाला संपूर्ण लेखातील प्रेम संदेश (Love Quotes In Marathi) कसे वाटले, त्याबद्दल तुमचा अभिप्राय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment