सद्गुरु जग्गी वासुदेव सुविचार | Sadhguru Quotes In Marathi |

प्रस्तुत लेखात सद्गुरु जग्गी वासुदेव यांचे विचार (Sadhguru Quotes In Marathi) सांगण्यात आलेले आहेत. त्या विचारांनी तुमच्या आयुष्यात नक्कीच फरक पडेल असा आम्हाला विश्वास वाटतो.

सद्गुरु जग्गी वासुदेव हे एक अध्यात्मिक योगगुरू आणि रहस्यवादी व्यक्तिमत्त्व आहे. ईशा फाऊंडेशन या त्यांच्या योगा संस्थेतर्फे अनेक समाजोपयोगी आणि लोक हितार्थ कामे केली जातात.

अध्यात्मिक जागृतीचे महत्त्वपूर्ण काम हे त्यांच्या निरीक्षणात आणि मार्गदर्शनात होत असते. खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृती आणि अध्यात्म जपण्याचे आणि वाढवण्याचे काम ही संस्था करत असते.

सद्गुरू जग्गी वासुदेव सुविचार | Sadhguru Life Quotes In Marathi |

Devotion is not a concept, not a certain kind of ideology, not a certain kind of act, it is the agent of dissolution.

भक्ती ही संकल्पना नाही, एक विशिष्ट प्रकारची विचारधारा नाही, विशिष्ट प्रकारची कृती नाही तर ती व्यक्तीसाठी विघटन (समर्पण) घटक आहे.

If you are wired to your memory, repetitions will happen and redundancy will come; but if you are paying attention, that changes your ability to look at things.”

जर तुम्ही तुमच्या स्मृतीशी जोडले गेले असाल तर जगण्यात कृतींची पुनरावृत्ती होईल आणि त्यांचा अतिरेक होईल. परंतु जर तुम्ही प्रत्येक कृतीत आणि गोष्टीत बारकाईने लक्ष दिले, तर त्या गोष्टींकडे पाहण्याची तुमची क्षमता बदलते.

Are you here to experience life or think about it?

तुम्ही इथे जीवन अनुभवण्यासाठी आहात की त्याबद्दल विचार करण्यासाठी आहात?

Every other creature on the planet is doing its best. Only human beings hesitate about that.

या ग्रहावरील प्रत्येक प्राणी उत्तम प्रकारे स्वतःचे कार्य बजावत आहेत. केवळ मानवच त्याविषयी संकोच करतात.

Whether you are running a business, an industry, or a nation – what is needed are insight, integrity, and inspiration.

आपण एखादा व्यवसाय, उद्योग किंवा एखादे राष्ट्र चालवत असाल तर आवश्यक असणाऱ्या गोष्टी म्हणजे – अंतर्दृष्टी, अखंडता आणि प्रेरणा!

You can give joyfully only when you have found something so valuable within yourself that everything else does not mean so much to you anymore.

तुम्ही आनंदाने तेव्हाच देऊ शकता जेव्हा तुम्हाला स्वतःच्या आतमध्ये इतके मौल्यवान काहीतरी सापडेल की बाकी काहीही तुम्हाला तेवढे महत्त्वपूर्ण वाटणार नाही.

Too many people are hungry not because there is dearth of food. It is because there is dearth of love and care in human hearts.

अन्नाची कमतरता असल्याने बरेच लोक भुकेलेले आणि उपाशी नाहीत, तर ते मानवी अंत:करणात प्रेम आणि काळजीची कमतरता असल्याने उपाशी आहेत.

If it is conditional, it is not love.

जर सशर्त असेल तर ते प्रेम नाही.

The essence of spirituality is, to be constantly aware of the oneness of all; at the same time to celebrate the uniqueness of the individual.

अध्यात्माचे सार म्हणजे, सर्वांच्या एकतेबद्दल सतत जाणीव असणे; आणि त्याच वेळी प्रत्येक व्यक्तीचे वेगळेपण साजरे करणे.

Being a seeker means no matter what the Vedas said, what Krishna or Shiva said, you have to know the truth in your own experience.

साधक असण्याचा अर्थ असा नव्हे की वेदांनी काय सांगितले, भगवान कृष्ण किंवा भगवान शिव काय म्हटले, त्याची पर्वा ही न करता तुम्हाला स्वतःच्या अनुभवात सत्य माहित असले पाहिजे.

Yoga essentially means finding the keys to the nature of the existence.

योग म्हणजे मूलत: अस्तित्वाच्या स्वरूपाची चावी शोधणे.

If you want to create a beautiful world, people in positions of responsibility and power should know a certain sense of joyfulness and peacefulness.

जर तुम्हाला एक सुंदर जग बनवायचे असेल तर, जबाबदारीच्या आणि ताकतीच्या पदांवर असलेल्या लोकांना आनंदाची आणि शांततेची जाणीव असली पाहिजे.

Mental alertness is not awareness. Mental alertness only enhances your survival instincts. It does not take you towards liberation.

मानसिक सतर्कता ही जागरूकता नसते. मानसिक सतर्कता केवळ आपल्या जगण्याची अंतःप्रेरणा वाढवते. ती तुम्हाला मुक्तीकडे घेऊन जात नाही.

Inward is not a direction. Inward is a dimension.

अंतर्मुखता ही दिशा नाही तर ते एक परिमाण आहे.

If you care for people around you, you must make yourself into a person they enjoy being with.

जर तुम्ही तुमच्या सभोवतालच्या लोकांची काळजी करत असाल. तर त्या लोकांना जशा व्यक्तीचा सहवास आवडेल तसे तुम्ही स्वतःला बनवलं पाहिजे.

Spirituality does not mean going away from life. Spirituality means becoming alive in the fullest possible way so you are not just alive on the surface, you are alive to the core.

अध्यात्म म्हणजे आयुष्यापासून दूर जाणे नव्हे. अध्यात्म म्हणजे शक्य तितके जिवंत बनणे ज्यामुळे तुम्ही केवळ वरचेवर जिवंत नसता, तर तुम्ही अत्यंत आतून (गाभ्यातून) जिवंत असता.

Every basic act like eating and copulating becomes magical when you do it consciously.

खाणे आणि हाताळणे यासारखे प्रत्येक मूलभूत कृत्य जादूई होऊ शकते जर ते कृत्य तुम्ही सजगतेने किंवा जाणिवेने करत असाल.

I do not understand why people want to control their minds. I want them to liberate their minds.

लोकांना त्यांच्या मनावर नियंत्रण का ठेवायचं आहे हे मला समजत नाही. मला वाटते की त्यांची मने मुक्त झाली पाहिजेत.

The fear is simply because you are not living with life, You are living in your mind.

जीवनात भीती आहे कारण तुम्ही जीवनासह जगत नाहीये, तुम्ही तुमच्या मनामध्ये जगत आहात.

Most people are ego-sensitive, not life-sensitive.

बरेच लोक अहंकार-संवेदनशील असतात, आयुष्य-संवेदनशील नसतात.

“I’m not interested in the wellbeing of society because society is a big lie. Where is society? I only see individual beings and only the individual can grow. Each one is enormous and tremendous in his own way-each one is unique.”

मला समाजाच्या कल्याणामध्ये रस नाही कारण समाज एक मोठं खोट आहे. समाज कोठे आहे का? मी केवळ व्यक्ती पाहतो आणि केवळ व्यक्तीच वाढू शकतो. प्रत्येक जण त्याच्या स्वत:च्या मार्गाने प्रचंड आणि जबरदस्त आहे – प्रत्येकजण अनन्य आहे.

“Blissfulness does not compel you to behave in any particular way.”

आनंदीपणा तुम्हाला कोणत्याही विशिष्ट मार्गाने वागण्यास भाग पाडत नाही.

“Meditation is the only way to freedom from stress as it is a dimension beyond the mind. All the stress and struggle are of the mind.”

तणावातून मुक्त होण्याचा ध्यान हा एकमेव मार्ग आहे कारण ध्यान हे एक मना पलिकडचे परिमाण आहे. सर्व ताण आणि संघर्ष हे मनाचे असतात.

“It is not because there is God that devotion has come; because there is devotion, there is God.”

देव आहे म्हणून भक्ती निर्माण झालेली आहे असे नाही तर भक्ती आहे म्हणून देव आहे.

“Do not try to fix whatever comes in your life. Fix yourself in such a way that whatever comes, you will be fine.”

तुमच्या आयुष्यात जे काही येईल ते निश्चित करण्याचा प्रयत्न करू नका. स्वत:ला अशा प्रकारे निश्चित करा की, जे काही येईल, तुम्ही उत्तमच असाल.

“Trying to change social, national, or global realities without working on human consciousness means there is no serious intention.”

मानवी चेतनेवर कार्य न करता सामाजिक, राष्ट्रीय किंवा जागतिक वास्तविकता बदलण्याचा प्रयत्न करणे म्हणजे तेथे कसलीच प्रखर इच्छाशक्ती नाही.

“If only there is a sufficient number of people whose experience of life goes beyond body and mind, this world will be a very different place.”

असे काही लोक असतील ज्यांचा आयुष्याचा अनुभव शरीर आणि मनाच्या पलीकडे आहे, तर हे जग खूप वेगळे ठिकाण असेल.

“Spirituality is not a disability – it is a phenomenal empowerment of life.”

अध्यात्म हे अपंगत्व नाही – ते जीवनाचे अपूर्व सामर्थ्य आहे.

“Devotion is not drama. Devotion is a way of living. Devotion is the way you walk, the way you breathe, and the way your heart beats.”

भक्ती नाटक नाही. भक्ती हा जगण्याचा एक मार्ग आहे. भक्ती तो मार्ग आहे जो तुम्ही चालता, तुम्ही ज्या प्रकारे श्वास घेता, आणि ज्या प्रकारे तुमचे हृदय धडकते.

“If you look at creation the way it is, it is explosively beautiful.”

जशी सृष्टी आहे तशीच जर तुम्ही सृष्टीकडे पाहिलेत, तर ती विस्फोटकरित्या सुंदर आहे.

“Only when you stop identifying yourself with things that are not you, the possibility of knowing the nature of your existence arises.”

स्वतः नसलेल्या गोष्टींबरोबर जेव्हा तुम्ही स्वत:ची ओळख देणे थांबविता तेव्हाच आपल्या अस्तित्वाचे स्वरूप जाणून घेण्याची शक्यता उद्भवते.

“Ignoring the source of creation and trying to conduct your life yourself is a terribly egoistic and ignorant attitude towards life.”

सृष्टीच्या स्त्रोताकडे दुर्लक्ष करणे आणि आपले आयुष्य स्वत: चालवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे जीवनाबद्दल अत्यंत अहंकारी आणि अज्ञानी वृत्ती असणे.

“If you live your life burning for the highest possibility, in that burning itself, there is liberation.”

जर तुम्ही स्वतःचे जीवन एका अत्युच्च शक्यतेसाठी जगत (जाळत) असाल, तर त्या जगण्यातच (जळण्यातच) मुक्ती आहे.

“A snake knows more about what is happening around than any other creature, because it has no ears to listen to gossip – only direct perception.”

एका सापाला इतर जीवांपेक्षा जवळपास काय घडत आहे त्याबद्दल अधिक माहिती असते, कारण त्यास गप्पा ऐकायला कान नाहीत – फक्त थेट धारणा आहे.

“Life happens from within. How aware you are of it, decides the quality of your body, your mind, and your experience of life.”

जीवन आतून घडत असते. तुम्ही त्याबद्दल किती जागरूक आहात, ती जागरूकताच तुमचे शरीर, तुमचे मन, आणि तुमच्या जीवनाच्या अनुभवाच्या गुणवत्तेचा निर्णय घेते.

“Memory creates a hallucination of the past, desire creates a hallucination of the future.”

स्मरणशक्ती भूतकाळाचा भ्रम निर्माण करते, वासना भविष्याचा भ्रम निर्माण करते.

“Most human beings live like a bird in a cage whose door was blown away.”

बहुतांश लोकं पिंजऱ्यातील पक्ष्याप्रमाणे जिवंत राहतात ज्याचा दरवाजा उडालेला आहे.

“Everything that can be created has already been done in creation. As human beings, we can only imitate, not create as such.”

निर्माण करता येणारी प्रत्येक गोष्ट सृष्टीमध्ये आधीच केली गेली आहे. मानव म्हणून आपण केवळ अनुकरण करू शकतो, यासारखे काही तयार करु शकत नाही.

“Only if you are joyful, you can be free from the fruit of action.”

आनंदी असल्यावरच, तुम्ही कर्माच्या फळापासून मुक्त होऊ शकता.

“I barely belong to this world, but still I’m participating.”

मी जवळजवळ या जगाशी संबंधित नाहीच, परंतु तरीही मी त्यात भाग घेत आहे.

“When you consciously choose to be ordinary, you become extraordinary.”

जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक सामान्य असणे निवडता, तेव्हा तुम्ही असामान्य बनता.

“Meditation is a way of moving into the unlimited dimension of who you are – it is the ultimate freedom.”

ध्यान हा तुम्ही कोण आहात याच्या अमर्यादित परिमाणात जाण्याचा मार्ग आहे. ते अंतिम स्वातंत्र्य आहे.

“The focus of education should not be on suppressive information but on kindling the thirst for knowing.”

शिक्षणाचा केंद्रबिंदू दडपशाहीपूर्ण माहितीवर नसावा तर, जाणून घेण्याची तहान भागवण्यावर असावा.

“If you do not choose to become a steady source of blissfulness for yourself and everything around you, you will remain an immature life.”

जर तुम्ही स्वत:साठी आणि तुमच्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीसाठी आनंदाचा स्थिर स्रोत म्हणून निवडत नसाल तर तुम्ही अपरिपक्व आयुष्य बनून राहाल.

“To create something and not to be attached to what you have created is a spiritual process.”

काहीतरी तयार करणे आणि तुम्ही तयार केलेल्या गोष्टींशी जोडले न जाणे म्हणजेच आध्यात्मिक प्रक्रिया.

“To simply sit here and know the tenderness of being alive means being drenched in love.”

फक्त इथे बसून राहणे आणि जिवंत राहण्याची कोमलता जाणून घेणे म्हणजेच प्रेमात भिजले जाणे.

“People have fallen in love with words and lost the world. It’s time to regain it.”

लोक शब्दांच्या प्रेमात पडले आहेत आणि जग गमावत आहेत. आता ते परत मिळवण्याची वेळ आली आहे.

“When you are no more identified with your physicality, you become available to Grace.”

जेव्हा तुम्ही तुमच्या शारीरिकतेशी जास्त ओळख दाखवत नाही तेव्हा तुम्ही कृपेला उपलब्ध होता.

“You are a piece of creation. If you go against any other piece of creation, you are unknowingly going against yourself.”

तुम्ही सृष्टीचा (निर्मितीचा) भाग आहात. जर तुम्ही इतर कोणत्याही सृष्टीच्या भागा विरोधात गेलात तर तुम्ही नकळत स्वतःच्या विरुद्ध जात आहेत.

“One who explores and knows all aspects of his life, is called self-realized.”

जो आपल्या जीवनातील सर्व गोष्टी शोधतो आणि जाणतो त्याला आत्म-अनुभूती झाली असे म्हणता येईल.

“Spiritual sadhana is not about making you into something other than what you are, but to erase the false faces that you have created for yourself.”

आध्यात्मिक साधना म्हणजे तुम्ही जे आहात त्याव्यतिरिक्त दुसरे कोणीतरी तुम्हाला बनवण्याविषयी नाही, तर तुम्ही तयार केलेले खोटे चेहरे पुसून टाकण्यासाठी आहे.

“When the very source of creation is within you, all the solutions are within you.”

जेव्हा सृष्टीचा स्रोत तुमच्या आत आहे, तेव्हा सर्व निराकरणे तुमच्यामध्ये असतात.

“Once your mind becomes absolutely still, your intelligence transcends human limitations.”

एकदा तुमचे मन पूर्णपणे स्थिर झाले की तुमची बुद्धिमत्ता मानवी मर्यादांना ओलांडते.

“Life has come from a very beautiful source. If you remain in touch with that source, everything about you will be beautiful.”

जीवन हे एका अतिशय सुंदर स्त्रोतातून आलेले आहे. तुम्ही त्या स्त्रोताच्या संपर्कात राहिल्यास, तुमच्याबद्दल सर्व काही सुंदर होईल.

“All thoughts are just junk. Essentially, they are coming from the limited experience of past.”

सर्व विचार फक्त रद्दी आहेत. मूलत: ते मर्यादीत भूतकाळातील अनुभवातून येत आहेत.

“People call books holy, but they are yet to realize that life is holy.”

लोक पुस्तकांना पवित्र म्हणतात पण जीवन पवित्र आहे हे त्यांना अद्याप कळले नाही.

“Devotion means who you are should merge with what you are doing. Otherwise, whatever your activity may be, it will not be of any great significance.”

भक्ती म्हणजे – तुम्ही कोण आहात हे, तुम्ही जे करता त्यामध्ये विलीन केले पाहिजे. अन्यथा, तुमची क्रिया जी काही असेल, ती काहीही महत्त्वपूर्ण असणार नाही.

“If you don’t invest your life in what you really care for, your life will be wasted. You will not fly – you will just drag yourself through life.”

तुम्ही खरोखर ज्या गोष्टींची काळजी करता त्यात जर तुम्ही तुमचे जीवन गुंतवले नाही तर तुमचे आयुष्य वाया जाईल. तुम्ही उडाण घेणार नाही – तुम्ही आयुष्यात फक्त स्वत:ला ओढत न्याल.

“Negative energies can’t touch you if you are in a state of meditativeness.”

तुम्ही ध्यान करण्याच्या अवस्थेत असल्यास नकारात्मक ऊर्जा तुम्हाला स्पर्श करू शकत नाही.

सद्गुरू जग्गी वासुदेव यांचे बहुमूल्य संदेश आणि विचार (Sadhguru Quotes In Marathi) हे प्रत्यकाचे आयुष्य बदलू शकतात. जीवनाला एक नवीन दिशा देऊ शकतात. त्यांचे विचार आवडल्यास नक्की कमेंट करा…

Leave a Comment