Recipe for appe in Marathi । डाळींचे पौष्टिक आप्पे कसे बनवावे!

तुम्ही जर शाकाहारी असाल किंवा मांसाहार करून जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही नक्कीच डाळींचे पौष्टिक , सर्व प्रथिने आणि जीवनसत्त्व यांनी युक्त असे ” आप्पे ” बनवू शकता. आप्पे नाश्त्यासाठी खूपच उपयुक्त असा पदार्थ आहे. आप्पे खूपच कमी वेळेत बनत असल्याने तुम्ही ही सुट्टी दिवशी हा बेत करू शकता.

Appe recipe ingredients
साहित्य –

१. तेल

२. उडीद डाळ – अर्धा वाटी

३. मुगडाळ – अर्धा वाटी

४. तांदुळ – १ वाटी

५. तुरडाळ – अर्धा वाटी

६. हरभरा डाळ – अर्धा वाटी

७. कांदे – २

८. कोथिंबीर १ जुडी

९. हिरवी मिरची पेस्ट १ चमचा

१०. आलं – लसुण पेस्ट – २ चमचे

११. मीठ ( चवीनुसार )

१२. जिरे – अर्धा चमचा

How to make Appe recipe in marathi.
कृती :

१. सर्व डाळी व तांदूळ स्वच्छ धुऊन घ्या. वेगवेगळ्या भांड्यात घेऊन ६ – ७ तास पाण्यात भिजवाव्यात.

२. त्यातील पाणी काढून टाका. तांदूळ व डाळी मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

३. सर्व मिश्रण एकत्र करून ७ – ८ तास आंबण्यासाठी ठेवावे. ( जर रेसिपी झटपट बनवायची असेल तर तुम्ही सोडा किंवा इनो वापरू शकता. इनो टाकल्यावर थोडे पाणी पण मिक्स करू शकता. )

४. आता मिश्रणात आले – लसूण पेस्ट , मिरची पेस्ट, मीठ, जिरे, २ चमचे तेल, बारीक चिरलेला कांदा व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

५. मिश्रण चांगले फेटून घ्यावे.

६. आप्पे भांडे गरम करायला ठेवा. आतून थोडे तेल लावून घ्यावे.

७. वरील मिश्रण चमच्याच्या साहाय्याने भरून घ्यावे.

८. आप्पे गॅसच्या मध्यम आचेवर दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावेत. खोबऱ्याची चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत “आप्पे” सर्व्ह करावे.

टिप – डाळींचे मिश्रण फेटताना जास्त पातळ होऊ देऊ नका.

Leave a Comment