प्रस्तुत लेख हा गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या आध्यात्मिक, तांत्रिक, वैष्णव, आणि भक्तिमय जीवनाचा परिचय करून देतो. रामकृष्ण परमहंस यांनी त्यांच्या पूर्ण जीवनात भक्ती, ज्ञान आणि धर्म प्रसार केला. चला तर मग पाहुयात कसे होते रामकृष्ण परमहंस (Ramkrushna Paramhans) यांचे गूढवादी जीवन!
Table of Contents
रामकृष्ण परमहंस मराठी माहिती संक्षिप्त | Ramkrushna Paramhans Information In Marathi In Short |
रामकृष्ण परमहंस यांचे खरे नाव गदाधर चट्टोपाध्याय होते. त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १८३६ रोजी कामारपुकुर, पश्चिम बंगाल येथे एका गरीब वैष्णव ब्राह्मण कुटुंबात झाला. ते एकोणिसाव्या शतकातील एक गूढ वादी, आध्यात्मिक सत्पुरुष आणि गुरु होते.
रामकृष्ण परमहंस खऱ्या अर्थाने जगविख्यात बनले ते म्हणजे स्वामी विवेकानंद यांचे गुरू म्हणून! परमहंस देव यांना त्यांचे सर्व शिष्य आणि आप्तेष्ट हे ईश्वरी अवतार मानत असत. सुरुवातीच्या जीवनात रामकृष्ण हे काली भक्त म्हणून प्रसिद्ध होते.
भक्ती आणि गूढता यामध्ये रामकृष्ण पारंगत होतेच परंतु ती केवळ भावना होती. त्यांना देवी काली खरोखर दर्शन देत असे. ऊर्जा आणि भावना यांचा खऱ्या अर्थाने जम बसवण्यात ते कुशल बनले होते. तंत्र आणि वैष्णव भक्ती यांत त्यांना परमानंद जाणवत होता.
परंतु एक दिवस तोताराम या सत्य जाणणाऱ्या महापुरुषाने रामकृष्ण यांना सत्य आणि कल्पना यातील फरक जाणवून दिला त्या दिवसानंतर रामकृष्ण खऱ्या अर्थाने धार्मिक आणि आध्यात्मिक अनुभवाला प्राप्त झाले.
रामकृष्ण हे अशिक्षित असल्याने त्यांची बोलीभाषा ग्रामीण होती परंतु आध्यात्मिक अनुभवामुळे त्यांची वाणी सुमधुर आणि रसाळ होती. त्यांच्या कथांचा आणि व्याख्यानाचा बंगाली जनतेवर विलक्षण प्रभाव दिसून येत होता. अनेक तार्किक आणि बौद्धिक लोकांना देखील ज्ञान देण्यात रामकृष्ण यशस्वी ठरले.
रामकृष्ण परमहंस यांचे बालपण – Ramkrushna Paramhans Childhood
गदाधर चटोपाध्याय म्हणजेच रामकृष्ण परमहंस यांच्या वडिलांचे नाव क्षुदिराम चट्टोपाध्याय (काही ठिकाणी ‘खुदीराम’ असा उल्लेख आहे.) आणि आईचे नाव चंद्रमणीदेवी असे होते. रामकृष्ण यांना लहानपणी सर्वजण गदा या नावाने ओळखत. शिक्षणात आणि तार्किक कौशल्यात त्यांना विशेष रस नव्हता. मातीच्या मूर्ती बनवणे, संगीत आणि कथा सांगणे यामध्ये त्यांचे विशेष प्राविण्य होते.
सत्पुरुष आणि संन्यासी यांच्याकडून ते लहानपणी कथा ऐकत असत आणि कथा सांगतही असत. पुरीच्या मार्गावर असताना त्यांच्या कामारपुकुर गावात जर कोणी संन्यासी, विद्वान ब्राह्मण जर विसाव्यासाठी थांबले तर रामकृष्ण त्यांची सेवा करत असत. त्यांचा तर्कशास्त्र व धार्मिक संवाद जाणून घेत असत.
वडिलांच्या निधनानंतर रामकृष्ण यांचे थोरले बंधू रामकुमार यांनी कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. रामकृष्ण हे आईच्या सानिध्यात राहू लागले. घरातील कामे, देवपूजा आणि आईची सेवा करू लागले. त्यानंतर काही काळाने रामकुमार हे कोलकात्यात पुरोहित बनले. भावाच्या सहाय्यतेसाठी रामकृष्ण १८५२ मध्ये कोलकात्याला गेले.
दक्षिणेश्वर येथील पौरोहित्य –
कोलकात्यात अस्पृश्य कैवर्त समाजातील एका जमीनदार घराण्यातील राणी रासमणीने दक्षिणेश्वर मंदिराची प्रतिष्ठापना केली. रामकुमार त्या मंदिरात प्रमुख पुजारी बनले. रामकुमार यांची मदत म्हणून रामकृष्ण यांनी मूर्तीच्या साजसज्जेचे दायित्व स्वीकारले. १८५६ साली रामकुमार यांच्या मृत्यूनंतर रामकृष्ण यांनी त्यांची जागा चालवली. त्यानंतर मंदिरातच ते राहू लागले.
पत्नी शारदादेवी – Wife Sharada Devi
रामकृष्ण यांच्या अति भावतन्मयतेमुळे सर्व लोक त्यांना वेडे समजू लागले होते. त्यांचा विवाह लावून द्यावा अशी त्यांच्या आईची इच्छा होती. रामकृष्ण परमहंस यांनी विवाहाला विरोध केला नाही. कामारपुकुर गावाजवळील जयरामवाटी गावच्या रामचंद्र मुखोपाध्याय यांची मुलगी शारदादेवी यांच्याशी रामकृष्ण परमहंस यांचा विवाह करण्यात आला.
भैरवी ब्राह्मणी व तंत्रसाधना –
Bhairavi Brahmani and Tantra Sadhana
१८६१ साली भैरवी ब्राह्मणी यांच्याशी रामकृष्ण यांची भेट झाली. भावनिक आणि अध्यात्मिक शक्तीमुळे रामकृष्ण यांचे शरीर आणि मन असह्य वेदना सहन करत होते. त्या वेदनेचा अंत करण्यासाठी भैरवी ब्राह्मणी यांनी रामकृष्ण यांस तंत्रसाधना करण्यास सांगितली. त्या साधनेमुळे रामकृष्ण बरे होत गेले.
तंत्र आणि मंत्र साधना पूर्ण करण्यासाठी रामकृष्ण यांना दोन वर्षे एवढा कालावधी लागला. रामकृष्ण हे भैरवी ब्राह्मणी यांस मातृभावनेने पुजत असत. तर भैरवी या रामकृष्ण यांस अवतार मानत असत. भैरवी यांनी त्यानंतर कुमारी पूजेची दीक्षा दिली ज्यामध्ये कुमारिकेला देवी समजून तिची पूजा करावी लागते.
वैष्णव भक्ती साधना –
Vaishnav Bhakti Sadhana
रामकृष्ण हे कमालीचे भावतन्मय व्यक्ती होते. कालीपूजा, रामभक्ती, कृष्णभक्ती या सर्व देवतांच्या पुजेमध्ये त्यांनी दास्यपद स्वीकारले होते. देवी कालीला ते विश्वजननी, स्वतःची आई मानत असत. त्यांनी रामभक्ती करताना स्वतःला हनुमान आणि कृष्णभक्तीवेळी स्वतःला राधा मानून भक्ती केली.
त्यांची भावना एवढी प्रबळ होती की ऊर्जेच्या स्वरूपात त्यांच्यापुढे सर्व काही प्रकट होत असे. देवी कालीचे दर्शन, वैष्णव भक्ती, कृष्ण आणि रामभक्ती या सर्वांमध्ये निर्माण झालेली तल्लीनता हे सर्वकाही त्यामुळेच घडत होते.
सत्य / परमार्थ प्राप्ती –
१८६४ साली तोतापुरी या वेदान्तिक संन्याशाकडून रामकृष्णांनी संन्यास घेतला. तोतापुरी हे आध्यात्मिक उन्नती साधलेले सिद्ध पुरुष होते. त्यांनी रामकृष्ण यांना अद्बैत तत्त्वज्ञान शिकवले. तोतापुरी यांच्याच मार्गदर्शनाखाली रामकृष्ण यांनी निर्विकल्प समाधी ज्ञान आणि अनुभव प्राप्त केला.
रामकृष्ण यांना इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मांबद्दल देखील कमालीचा आदर होता. सर्व धर्म समभाव त्यांच्या अंगी होता. जगातील सगळे धर्म म्हणजे नद्याच आहेत ज्या शेवटी सागरास म्हणजे अद्वैत शक्तीस मिळतात, असा त्यांचा समज होता.
रामकृष्ण यांनी १६ ऑगस्ट १८८६ रोजी महासमाधी घेतली. त्यांच्या महासमाधीनंतर त्यांचे परमशिष्य स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या संस्थेद्वारे त्यांचे धर्मकार्य सुरू ठेवले. रामकृष्ण यांचे विचार आणि कार्य पुढे नेण्याचे काम ही संस्था करते.
रामकृष्ण परमहंस मराठी माहिती (Ramkrushna Paramhans Marathi Mahiti) हा लेख तुम्हाला कसा वाटला? सर्व माहिती उपयुक्त वाटल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा…