आज थरार आणि ताल एकाचवेळी! बंगाल वॉरियर्स आणि दबंग दिल्ली एकमेकांसमोर

प्रो-कबड्डीचा हा सीझन सर्वात कठीण होता असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही. प्रत्येक सामना हा तेवढ्याच जिकिरीने आणि जिद्दीने खेळला गेला आहे. १२ संघांचा समावेश असलेल्या या लीगमध्ये अनेक चढउतार पहावयास मिळाले.    

जयपूर पिंक पँथर्स, पटना पायरेट्स, गुजरात फॉर्चून जायन्ट्स अशा मजबूत संघांना तर अंतिम ६ मध्ये देखील स्थान मिळालेले नाही. दबंग दिल्ली व बंगाल वॉरियर्स या संघांनी आपल्या कामगिरीत सातत्य राखत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या दोघांत असलेला हा सामना थरारकच होईल याबद्दल शंकाच नाही.

  • विशाल माने इतिहास घडवणार – दिल्ली जर जिंकली तर वेगवेगळ्या संघातून खेळताना त्याचे तिसरे जेतेपद असेल.
  • नवीन कुमारचे यंदा सलग २१ सुपर टेन आहेत. आपल्या संघाला फायनलमध्ये पोहचवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान.
  • दोन्ही संघात झालेल्या २ लढतीत एकदा बंगाल जिंकले आहे तर १ सामना बरोबरीत सुटला आहे.

दोन्ही संघांतील महत्वाचे पैलू :

१. दबंग दिल्ली

चाहत्यांची पसंती याच संघाला

– नवीन कुमार ( नवीन एक्स्प्रेस ) प्रमुख आकर्षण.

– मजबूत डिफेन्स. 

२. बंगाल वॉरियर्स

– सातत्यपूर्ण कामगिरी. 

– मनिंदर सिंगवर संपूर्ण मदार. 

– मजबूत रेडींग युनिट. (प्रभंजन व सुकेश हेगडेची योग्य साथ)

हे दोन्ही संघ लवकर ऑल आऊट होत नाहीत. कारण दोन्ही संघांतील डिफेन्स मजबूत आहे. हा शेवटचा सामना सर्व रोमांच पार करेल हे मात्र नक्की!

हे सुद्धा वाचा- “विसंगाशी घडो संग…” असच काहीसं झालय भाषेचंही आपल्या.

Leave a Comment