युवा फलंदाज पृथ्वी शॉ डोपिंगमध्ये दोषी, ८ महिन्यांसाठी निलंबित.

युवा क्रिकेटर पृथ्वी शॉ डोपिंग टेस्ट मध्ये दोषी आढळला आहे. त्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 8 महिन्यांसाठी निलंबित केले आहे. तो 15 नोव्हेंबर 2019 पर्यंत क्रिकेटपासून दूर असेल. वास्तविक, हा कालावधी मार्च 2019 पासून 8 महिने असेल. वेस्ट इंडीज विरुद्ध 2018 मध्ये दोन कसोटी सामने खेळणारा 19-वर्षीय पृथ्वी शॉ त्याच्या हिप वर उपचार घेत आहे.

बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार सय्यद मुश्ताक अली टी -२० स्पर्धेदरम्यान डोपिंगसाठी त्याची चाचणी घेण्यात आली होती आणि या टेस्टनुसार तो ‘टर्बूटलाइन’ खाण्यात दोषी आढळला. पृथ्वी शॉ व्यतिरिक्त विदर्भाचे अक्षय दुलवार आणि राजस्थानचा दिव्या गजराज हे दोन खेळाडू सुद्धा अँटी डोपिंग कोडच्या उल्लंघनासाठी दोषी आढळले. पृथ्वी शॉ याला 8 महिन्यांसाठी निलंबित केले गेले आहे, यानुसार तो 16 मार्च 2019 ते 15 नोव्हेंबर 2019 पर्यंत क्रिकेट खेळू शकत नाही. याचा अर्थ असा की बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरगुती मालिकेत तो खेळू शकणार नाही.

बीसीसीआयने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “मुंबई क्रिकेट असोसिएशने याचे कारण स्पष्ट करताना सांगितले कि, पृथ्वी शॉ ने नकळत प्रतिबंधित पदार्थाचे सेवन केले. हा पदार्थ सामान्यत: खोकल्याच्या औषधांमध्ये आढळतो. ” तसेच शॉ ने उल्लंघन करण्याचा आरोप स्वीकारला आणि असे सांगितले की त्याने हे अजाणतेपणाने केले, कारण त्याने खोकल्यासाठी ‘सिरप’ घेतला होता. त्याचे स्पष्टीकरण स्वीकारून बीसीसीआयने त्याच्यावर 8 महिन्यांची बंदी घातली.

एसएयूच्या नियमांनुसार 15 सप्टेंबर रोजी पृथ्वी शॉ ट्रैनिंग साठी परत येऊ शकतो . विधानानुसार, “बीसीसीआय एडीआरच्या कलम १०.११.२ नुसार क्रिकेट खेळाडू दोन महिने आधी क्लबमध्ये सराव करण्यासाठी संघात परतू शकतो. त्यानुसार शॉ सप्टेंबरमध्ये प्रशिक्षणात परत येऊ शकेल.

पृथ्वीने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना 23 ऑक्टोबर 2018 रोजी हैदराबाद येथे वेस्ट इंडीज विरूद्ध खेळला होता. त्याने आतापर्यंत भारतासाठी दोन कसोटी सामने खेळले आहेत.

Leave a Comment