पक्षाघात होणे ही काही सामान्य बाब नाही. आयुष्यभर किंवा काही वर्षे व्यंधत्व आल्यावर त्याची कारणे फक्त निदान केली जातात आणि तो होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते. संपूर्ण उपचार होणे याचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे त्याबाबत सजग राहणे केव्हाही चांगले. पक्षाघाताचा झटका ( स्ट्रोक ) आल्यास लगेच उपचार मिळणे खूप गरजेचे आहे.

मेंदूला नियमित रक्तपुरवठा होणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुमचे शरीर व्यवस्थित कार्य करू शकते. अन्यथा शरीरातील काही भाग लुळा पडतो. पक्षाघाताचे विविध प्रकार आहेत. या मध्ये पक्षाघात होण्याच्या तीव्रतेनुसार शरीराचे नुकसान होत असते. मेंदूला रक्‍तपुरवठा करणार्‍या एखाद्या धमनीमध्‍ये अडथळा निर्माण झाल्‍यामुळे पक्षाघात होतो. यामुळे मेंदुच्या ज्या भागाला हानी पोहोचते, मेंदुच्या त्या भागाद्वारे नियंत्रित केला जाणारा शरीरातील भाग निकामी होऊ शकतो. असे नुकसान तात्पुरते किंवा कायम स्वरूपाचे देखील असू शकते. तुम्हाला वेळेवर योग्य उपचार मिळाल्यास नुकसान वाचवू शकता व रक्तपुरवठा सुरळीत होऊ शकतो.

पक्षाघाताची लक्षणे –

१ – शरीराचे काही भाग अचानक सुन्‍न किंवा कमकुवत होणे. उदा. हात, पाय, चेहरा.

२ – दृष्टीमध्ये अंधुकपणा येणे किंवा दिसणे बंद होणे. (एका डोळ्याने दिसणे बंद होऊ शकते)

३ – दुसरा काय बोलत आहे ते न समजणे किंवा बोलायला न येणे.

४ – डोके अचानक दुखू लागणे, चक्कर येणे, तोल जाऊन खाली पडणे.

अशी लक्षणे वारंवार दिसत असल्यास ती तुम्ही वॉर्निंग समजू शकता. यालाच वैद्यकीय भाषेत ट्रान्जियंट इस्केमिक अटॅक ( लहान पक्षाघात ) असे म्हणतात. कालांतराने पक्षाघात होऊ शकतो. अशी लक्षणे आढळत असल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

पक्षाघात होण्यातील शक्यता –

१ – ऍथरोसिलेरोसिस (धमन्‍या कठोर होणे) :

रक्तवाहिन्या, धमन्या कठोर झाल्यास मेंदूला रक्तपुरवठा कमी होऊ शकतो व स्ट्रोकची शक्यता वाढते.

२ – अनियंत्रित मधुमेह :

साखर रक्तामध्ये असणे हितावह असते त्यामुळे आपल्याला काम करण्यासाठी ऊर्जा मिळत असते. परंतु याचे प्रमाण वाढल्यास अनेक प्रकारचे रोग जडतात. अनियंत्रित मधुमेह असेल तर मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही.

३ – उच्‍च रक्‍तदाब :

वारंवार ताणतणाव , टेन्शनचे वातावरण असेल तर रक्तदाब वाढतो. मनावर आणि सवयींवर नियंत्रण नसेल तर अनामिक भीती निर्माण होते. अशा भीतीतून कोणतीही परिस्थिती संकट वाटते आणि रक्तदाब वाढू लागतो. अशाने मग पक्षाघाताचा झटका येऊ शकतो.

४ – उच्‍च कोलेस्टेरॉल पातळी :

कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू न देणे यासाठी विशेष सजगता ठेवावी लागेल. अनेक प्रकारे असे नियंत्रण आपण ठेऊ शकतो. कोलेस्टेरॉलची चाचणी नियमित करावी.

५ – धूम्रपान आणि इतर व्यसने :

सर्व व्यसने कोणत्या न कोणत्या तरी कारणाने आजार घेऊन येतातच. व्यसनाची सवय रक्तदाब वाढवते. त्यातच स्ट्रोकची शक्यता देखील वाढते.

६ – हृदय विकार :

हृदय विकार कधीही जडू देऊ नका. रक्तदाब, व्यसन, मधुमेह, स्थूलपणा अशी प्रमुख करणे हृदय विकाराची आहेत. या रोगात देखील शरीरात रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही परिणामी पक्षाघात होऊ शकतो.

७ – कॅरोटिड धमनी (मेंदूला रक्‍तपुरवठा करणारी धमनी) :

ही धमनी जर व्यवस्थित काम करत नसेल किंवा त्याद्वारे रक्तपुरवठा करण्यात अडथळे निर्माण होत असतील तर स्ट्रोक येऊ शकतो.

Prevention is better than cure –
प्रतिबंध –

१ – वरील ज्या शक्यता सांगितलेल्या आहेत त्यानुसार आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे.

२ – उच्च रक्तदाब , मधुमेह, स्थूलपणा आणि आणखी काही विकार असल्यास उपचार चालू ठेवणे. नियमित तपासणी करून घ्या.

३ – फॅट आणि कोलेस्टेरोलयुक्‍त पदार्थ खाणे टाळा.

४ – धूम्रपान, व्यसन, मद्यपान टाळा.

५ – नियमित व्यायाम करावा. आहार आणि विहार, कमी ताणतणाव, हसते खेळते वातावरण असावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here