आपण सतत पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत असतो. परंतु ते जर कधी भाषा बोलू लागले तर..अशा कल्पनेचा विस्तार पक्षी बोलू लागले तर (Pakshi Bolu Lagle Tar Marathi Nibandh) या निबंधात करायचा असतो.
पक्षी बोलू लागले तर …| Pakshi Bolu Lagle Tar Essay In Marathi
शाळेत पक्ष्यांची कविता शिकताना मी नेहमी मंत्रमुग्ध होतो. पक्षी कसे बोलत असतील, कसा संवाद साधत असतील त्याचा विचार मी करू लागतो. आज मी बोलक्या चिमणीची कविता शिकलो, त्यानंतर मी विचारात गुंग होऊन गेलो, खरचं पक्षी माणसाची भाषा बोलू लागले तर…
पक्ष्यांचा संवाद हा फक्त एक विशिष्ट प्रकारचा आवाज असतो. आपण कधी रानात, जंगलात, अभयारण्यात जर गेलो तर आपल्याला नेहमीच पक्ष्यांचे आवाज कानावर पडतात. तोच संवाद ही एक भाषा असती तर! ऐकूनच किती नवल वाटतंय, नाही का?
एक चिमणी कावळ्याला विचारेल, “जेवलास का?” तेव्हा कावळा म्हणेल, “हो जेवलो, तू जेवलीस का चिऊ ताई?” असे शब्द कानावर पडले तर आपल्याला किती मज्जा येईल! कारण माणसांव्यतिरिक्त इतर कोणीही बोलू शकत नाही.
बोलण्यामुळे पक्षी एकमेकांची काळजी करू लागतील. त्यांच्या मनातही भावना निर्माण होतील. त्यांच्या आयुष्यातही व्यवहार निर्मिती होईल. जशी मानवी व्यवस्था आहे तशी संपूर्ण पक्षी व्यवस्था राबवली जाईल. कुटुंब, नाती, जबाबदारी अशा सर्व गोष्टी त्यांच्या जीवनात येतील.
घरट्यात राहून ते नेहमी हवामानाच्या, खाण्या-पिण्याच्या गप्पा मारत राहतील. एकमेकांचा अंदाज घेऊन बोलत राहतील. “आज खाद्य आणण्यासाठी कुठे जाऊ?” असे दुसऱ्या पक्ष्यांना विचारतील. दुसरे पक्षी त्याच्या पुढचा संवाद घडवून आणतील.
पक्षी बोलू लागले तर त्यांचे जीवन सुरळीत होईल आणि मानवाला त्याचे फायदे आणि तोटे होतील. माणूस आणि पक्षी कदाचित एकत्र पण राहू शकतील. माणूस पक्षांना विविध कामे करायला लावेल. माणसाशी संवाद साधला की पक्षीही सुशिक्षित आणि अशिक्षित असा व्यवहार करू लागतील.
माणसाची समज आहे तशी पक्ष्यांची देखील समज निर्माण होईल. त्यामुळे निसर्गात फक्त व्यवस्था आढळेल पण पक्ष्यांच्या आयुष्यातील स्वातंत्र्य निघून जाईल. बोलू लागल्याने ते त्यांच्या आयुष्यातील कुतूहल आणि आश्चर्य विसरून जातील.
पक्ष्यांचाही अहंकार निर्माण होईल. तेही इतरांना तुच्छ आणि श्रेष्ठ समजू लागतील. सध्या त्यांच्यामध्ये असणारी समता आणि शांती बोलू लागल्यानंतर राहणार नाही. त्यांचेही आयुष्य फक्त बोलकी यंत्रणा होईल पण जगण्यातील सुगंध मात्र राहणार नाही.
“पक्षी बोलू लागले तर”, ही कल्पना छान आहे पण निसर्गाची किमया आणि सृष्टीत वैविध्य राहणार नाही. त्यांचा किलबिलाट आपल्याला प्रिय वाटतो कारण तो त्यांचा आनंद असतो. परंतु ते जर बोलू लागले तर मात्र किलबिलाट हा आनंद राहणार नाही.
संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला पक्षी बोलू लागले तर हा मराठी निबंध (Pakshi Bolu Lagle tar Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…