लोकसभेमध्ये जेव्हा तिहेरी तलाक हे विधेयक चर्चेसाठी ठेवण्यात आले होते तेव्हा AIMIM चे प्रमुख व हैद्राबादचे खासदार यांनी या विधेयकाला विरोध केला. या वेळी ओवेसी म्हंटले की हे विधेयक भारतीय घटनेच्या विरोधात असून, अजून सुध्दा देशात महिलांवर अत्याचार होणे थांबलेलं नाही त्यामुळे हे विधेयक आणू नये असे त्यांनी म्हटले होते.
आपल्या भाषणाची सुरुवात करताना त्यांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला व आपण जिवंत असे पर्यंत या विधेयकाला विरोध करत राहू. आता पर्यंत आपण या विधेयकाविरोधात संसदेत तिसऱ्यांदा उभा असून तीन तलाक सरकारने गुन्हा ठरवलं आहे मग आता या महिलांचे पालनपोषण कोण करेल? असा सवाल त्यांनी सरकारला केला.
यापुढे ते म्हणाले की,”इस्लाम मध्ये निकाहनामा आहे त्यामुळे तुम्ही अशी अट ठेवा की जर कोणी तिहेरी तलाक दिला तर त्याने महिलेला मेहेर च्या रकमेच्या ५०० पट दंड द्यावा. इस्लाम मध्ये लग्न हे जन्म-जन्माचे नाते नसून ते केवळ एका जन्मतले कॉन्ट्रॅक्ट आहे. सात जन्मासाठी ठेवा अस तुम्ही म्हणत आहात पण आम्ही एका जन्मताच खुश आहोत हे म्हणतानाच त्यांनी पुढे त्यांचा हजरजबाबीपणा दाखवत म्हणाले की ‘बघा इथे सगळे विवाहित आहेत त्यामुळे घरी काय काय अडचणी असतात हे तुम्हाला ठाऊक आहेच असे गमतीशीर वक्तव्य सुध्दा त्यांनी केले याला सर्वांनी दाद दिली एवढेच काय तर खुद्द भारताचे गृहमंत्री अमित शहा यांना सुध्दा यावर हसू आवरले नाही.
मागच्या वर्षी जुलै महिन्यात सुप्रीम कोर्टाने सरकारला मॉब लींचींग वर कायदा बनवण्यास सांगितला होता तरी अजून तो कायदा तयार झाला नाही अशी आठवण ओवीसी यांनी सरकारला करून दिली. तसेच राज्यसभेत तिहेरी तलाक मंजूर झाल्यानंतर त्यांनी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांवर टीका केली. विरोधी पक्षांना विधेयकाला विरोध करण्यासाठी आपल्या सदस्यांना व्हीप बजावता आलीं नाही.
विशेष म्हणजे मोदी सरकारचे राज्यसभेत बहुमत नसताना सुध्दा हे विधेयक मंजूर होणे ही एक लक्षणीय घटना आहे. यावेळी ओवेसींनी सपा, बसपा व इतर पक्षांवर सडकून टीका करताना म्हणाले की मुस्लिमांचे हितचिंतक मतदानावेळी कुठे होते. त्यांना साधा आपल्या खासदारांना व्हीप बजावता आला नाही.
तिहेरी तलाक बद्दल सरकारची भूमिका मांडताना भारत सरकार मधील कायदामंत्री रविप्रसाद शंकर म्हणाले की विधेयका मागे कोणत्याही स्वरूपाचे राजकारण नसून महिलांना न्याय, सन्मान, व त्यांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी कायदा आणण्यात आला आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून हे विधेयक आणणे गरजेचे आहे असे ही ते म्हणाले व काँग्रेस च्या व्होट बँकेच्या राजकारणाबद्दल सडकून त्यांच्यावर टीका केली.