प्रस्तुत लेख हा मेडिक्लेम पॉलीसी विषयी संपूर्ण माहिती (Mediclaim Policy Marathi Mahiti) देणारा लेख आहे.
अचानक उद्भवलेल्या आजाराच्या स्थितीत रुग्णाचे नातेवाईक अतिभावूक झालेले असतात, त्यातच अवास्तव आर्थिक भुर्दंड सोसणे काहीवेळा शक्य होत नाही.
अशा संकट समयी त्यांना आर्थिक खर्च भरपाईची गरज भासते. त्यासाठी मेडिक्लेम पॉलीसी घेणे ही फायदेशीर ठरणारी गोष्ट ठरते.
Table of Contents
मेडिक्लेम पॉलीसी म्हणजे काय? Mediclaim Policy Information In Marathi
• मेडिक्लेम म्हणजे वैद्यकीय भरपाई विमा योजना. या योजनेचा लाभ वैद्यकीय खर्चात होतो. जर आपण मेडिक्लेम पॉलीसी काढलेली असेल तर बहुतांश वैद्यकीय खर्चाची बचत होते.
• वैद्यकीय विमा योजनेचा वार्षिक हफ्ता म्हणजे
प्रिमियम. प्रत्येक वर्षी हा हफ्ता भरल्यावर मेडिक्लेम चालू राहतो. मेडिक्लेम व्यक्तिगत आणि सामुहिक स्वरूपाचे असतात.
मेडिक्लेम पॉलिसीमधील काही संकल्पना – Mediclaim Policy Terms In Marathi
• मेडिक्लेम प्रिमियम म्हणजे वैद्यकीय विमा योजनेचा वार्षिक हफ्ता होय.
• क्लेम म्हणजे विमा कंपनीने वैद्यकीय खर्चाची केलेली भरपाई होय. ही भरपाई नियमानुसार काही वेळा संपूर्ण असते तर काही वेळा कमी असते.
• मेडिक्लेम पॉलिसी काढूनही जर कोणी एखाद्या वर्षी वैद्यकीय भरपाई घेतली नाही, तर मात्र पुढील वर्षी विमा चालू ठेवताना काही प्रमाणात सुट मिळते त्याला नो क्लेम बोनस असे म्हणतात.
• फॅमिली कव्हर म्हणजे कुटुंबातील व्यक्तींना वैद्यकीय विमा संरक्षण देणे.
• अपघात विम्यात विमाधारक व्यक्तीला रुग्णालयातील होणाऱ्या खर्चात भरपाई मिळते. अपघात विम्यात डेथ बेनिफिट असते ज्यामध्ये अपघातात मृत्यू झाल्यास अधिक भरपाई मिळते.
• मेडिक्लेम लिमिट म्हणजे भरपाई खर्चाची जी रक्कम मिळते त्याची मर्यादा. (समजा, खर्च संरक्षण ५० हजार मिळणार असेल तर ती रक्कम त्या वैद्यकीय भरपाई योजनेची मेडिक्लेम लिमिट होय.)
• रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर रोख रक्कम द्यावी न लागणे म्हणजे “कॅशलेस” होय. विमा कंपनी रुग्णालयाचे सर्व बिल भरणार असा त्याचा अर्थ होतो. परंतु रुग्णालय हे विमा कंपनीच्या मान्यताप्राप्त रुग्णालयांत असले पाहिजे. इतर रुग्णालयांत उपचार घेतल्यास बिल दाखवून त्याचा क्लेम विमा कंपनीकडे सादर करावा लागतो.
• टी.पी.ओ. म्हणजे थर्ड पार्टी ऑर्गनायझेशन होय. ही संस्था विमा कंपनी, विमा ग्राहक आणि रुग्णालय यांमधील मध्यस्त संस्था असते. टी.पी.ओ. आपले क्लेम तपासून पैसे देण्याची व्यवस्था करतात.
मेडिक्लेम पॉलिसीचे प्रकार – Types Of Mediclaim Policies
• वैयक्तिक विमा –
यामध्ये फक्त एकाच व्यक्तीची रुग्णालय खर्च भरपाई मिळते म्हणजेच आरोग्य विमा अंतर्गत फक्त एकाच व्यक्तीला त्याचा लाभ होतो.
• कौटुंबिक विमा –
व्यक्तीवर अवलंबून असलेल्या पालकांचा अथवा संपूर्ण कुटुंबाचा आरोग्य विमा एकाच रकमेवर काढू शकतो. कौटुंबिक विमा प्रकारात कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आजारावर होणाऱ्या खर्चाची भरपाई दिली जाते.
• गटविमा ( सामूहिक विमा )
एखादी संस्था किंवा कंपनी असेल त्यामधील सर्वांनी एकत्रितपणे घेतलेली विमा योजना म्हणजे गटविमा होय. विमा ग्राहकांची संख्या जास्त असल्यामुळे विम्याचा हफ्ता कमी भरावा लागतो.
या तीन प्रमुख प्रकारांव्यतिरिक्त गंभीर आजार विमा (Critical Illness), हॉस्पिटल डेली कॅश बेनिफिट प्लॅन (प्रत्येक दिवसासाठी रक्कम), वरिष्ठ नागरिक आरोग्य विमा योजना असेही काही विमा भारतात सध्या उपलब्ध आहेत.
आरोग्य विमा योजनांचे फायदे व तोटे – Benefits of Health Insurance Policy (Mediclaim Policy)
फायदे –
• अवास्तव वैद्यकीय खर्च परवडत नसल्याने त्या खर्चाची भरपाई आरोग्य विमा योजने अंतर्गत होते, हा विमाधारकांसाठी फायदाच आहे.
• वैद्यकीय तंत्रज्ञान आणि उपचार पद्धतीत कमालीची सुधारणा झाल्याने सेवा दर आणि उपचार दर वाढलेले आहेत अशातच सामान्य लोक रुग्णालयाचे बिल भरू शकत नाहीत. त्यावेळी आरोग्य विमा खूपच फायदेशीर ठरतो.
तोटे –
• मेडिक्लेम पॉलिसीत सर्व प्रकारच्या आजारांत खर्च भरपाई मिळत नाही.
• सेवा दरावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने रुग्णालये अवास्तव बिल देतात ज्यामुळे रुग्णाला विमा संरक्षण तर मिळते पण विमा कंपनीला मात्र तोटा सहन करावा लागतो.
• सर्वत्र मेडिक्लेम सारख्या योजनांमुळे वैद्यकीय सेवांचे दर वाढत आहेत आणि ज्यांना विमा संरक्षण नसते त्यांनाही हा वाढता दर द्यावा लागत आहे. म्हणजेच आरोग्य विमा योजनांमुळे वैद्यकीय सेवा महाग होत चाललेल्या आहेत.
• भारतात विमाधारक प्रमाण खूपच कमी असल्याने विमा कंपनी खऱ्या अर्थाने भरपाई देताना तोट्यात आहेत.
मेडिक्लेम संदर्भात विचारले जाणारे अति महत्त्वाचे प्रश्न – (Mediclaim FAQ’s in Marathi)
१) मेडिक्लेम कधी ग्राह्य ठरत नाही?
मेडिक्लेम घेण्यापूर्वी काही आजार असल्यास ती मेडिक्लेम पॉलीसी खर्च भरपाई देत नाही. तसेच मेडिक्लेम घेतल्यानंतर पहिले तीन महिने काही आजारांना संरक्षण मिळत नाही. कारण आजाराची लक्षणे दिसू लागल्यानंतर काही जण मेडिक्लेम पॉलिसी काढतील आणि आजार झाल्यानंतर लगेच आर्थिक संरक्षण मागतील.
रुग्णालयातील अपेक्षित उपचाराला मेडिक्लेम संरक्षण मिळत नाही. (उदा. बाळंतपण, सिझेरियन, ऍबॉर्शन) परंतु काही नवीन मेडिक्लेम योजना यासाठी पण संरक्षण देऊ करत आहेत.
२) सकल (सार्वत्रिक) आरोग्य योजनेचे काय फायदे होऊ शकतील?
सर्व आजारांवर विमा संरक्षण मिळत नसल्याने उपाय म्हणून सार्वत्रिक विमा योजना तयार करणे आता गरजेचे झाले आहे. सार्वत्रिक विमा योजनेत सर्व रुग्ण, सर्व आजार आणि सर्व रुग्णालये सामील असतील. अशाने विमाधारक वाढतील आणि अनेक प्रकारच्या आजारांत बहुसंख्य लोकांना विमा संरक्षण मिळेल. युरोपियन देशांमध्ये अशा योजना लागू आहेत.
३) रुग्णालयातील बिल आणि सेवांचे दर निश्चित असतात का?
नाही. रुग्णालयांना उपचार आणि सेवा रक्कम बिल स्वरूपात मिळते पण सेवा दर आणि उपचार दर हे निश्चित नसल्याने विमा कंपन्या आणि रुग्ण दोघेही नुकसान सहन करत आहेत.
परंतु त्यावर उपाय म्हणून निरनिराळया सेवांचे दर निश्चित करण्यात येत आहेत. त्या रकमेपेक्षा जास्त भरपाई दवाखाना प्राप्त करू शकणार नाही म्हणजेच जास्तीची रक्कम विमा कंपनी देणार नाही.
तुम्हाला मेडिक्लेम पॉलीसी – संपूर्ण माहिती (Mediclaim Policy Information in Marathi) हा लेख आवडला असल्यास आणि काही सूचना असल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा….