प्रस्तुत लेख हा आनंद या विषयावर १० सुविचारांचा संग्रह आहे. या लेखात आनंदाची वेगवेगळी छटा सुविचारांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेली आहे. चला तर मग पाहुयात आनंद या विषयावर आधारित १० सुविचार…
सुविचार संग्रह (विषय – आनंद) | Happiness Quotes in Marathi |
१. सुख आणि आनंद या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सुख हे क्षणिक असते आणि त्यानंतर दुःखही प्राप्त होते. आनंदाने आनंद वाढतच जातो.
२. आनंद हा मानवी स्वभाव आहे. बाकी सर्व बाबी जशा की भावना, मानसिकता, बुद्धीचातुर्य या बदलत जातात किंवा विकसित होत राहतात.
३. आनंद ही प्रत्येक व्यक्तीची तहान आहे. आनंदी राहिल्यावर आपण ईश्वर स्वरूप बनत असतो. त्यामुळेच प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या प्रकारे आनंद शोधण्याचा प्रयत्न करतच असतो.
४. काहीतरी केल्यावर आनंद मिळेल ही संकल्पनाच चुकीची आहे. आनंदी राहिल्यावर काहीही करा तुम्हाला खरे यश प्राप्त होईल.
५. आनंदाची अनुभूती ही मानवी जीवनातील सर्वोच्च अनुभूती आहे. आपण संवेदनशील बनत गेल्यास आपल्या आनंदात वृद्धी होत असते.
६. शरीर, मन आणि चेतना अशा विविध स्तरांवर आनंदाची अनुभूती वेगवेगळी असते. आपण कोणत्या स्तरावर जगतो त्यावर आपल्या आनंदाची परिभाषा निर्मित होत असते.
७. काल्पनिक आयुष्यात आनंद हा भविष्यात असतो तर वास्तविक आयुष्यात आनंद हा वर्तमानात मिळतो.
८. स्वतः आनंदी राहणे आणि आनंदाचा प्रसार करणे यातच खरे शाश्वत सुख सामावलेले आहे.
९. जीवन कोणत्याही प्रकारे मृत्यूला सामोरे जाणारच आहे. तुम्ही आनंदी जगा किंवा दुःखी, निवड तुमचीच असते.
१०. शारिरीक, मानसिक आरोग्य सुधारत नेल्यास आपल्याला आनंदी जीवनाची प्रचिती येत असते.
तुम्हाला मराठी सुविचार (आनंद) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…