प्रस्तुत लेख हा मकर संक्रांत या सणाविषयी मराठी माहिती (Makar Sankrant Information in Marathi) देणारा लेख आहे. या लेखात मकर संक्रांत सण कसा साजरा केला जातो व कोणकोणते विधी पार पाडले जातात याविषयी माहिती दिलेली आहे.
मकर संक्रांत – मराठी माहिती | Makar Sankrant Mahiti Marathi |
सांस्कृतिक, कृषी व भौगोलिक महत्त्व असणारा मकर संक्रांत हा सण पौष महिन्यात असतो. उत्तरायणाला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांत म्हणजे जानेवारी महिन्यात मकर संक्रांत हा सण येत असतो. या दिवशी सूर्य हा पूर्णपणे मकर राशीत प्रवेश करत असतो.
प्रत्येक वर्षी मकर संक्रांत हा सण १४ किंवा १५ जानेवारी या दिवशी असतो. मकर संक्रांत हा सण भारतात विविध पद्धतीने साजरा केला जातो. भारतात कृषी संस्कृती असल्याने शेती विषयक बाबी आणि विविध प्रथांचा समावेश या सणात केला जातो.
संक्रांतीच्या दिवसात उगवलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकींना देतात. ववसा देणे, ओटी भरणे, आणि हळदी – कुंकू लावणे असे विविध कार्यक्रम या सणात आयोजित केले जातात. संकांतीला थंड वातावरण असल्याने शारिरीक ऊर्जा प्रदान करणारे सर्व प्रकारचे पदार्थ या सणाला ग्रहण केले जातात.
महाराष्ट्रात मकर संक्रांत हा सण भोगी, संक्रांत आणि किंक्रांत अशा तीन दिवशी साजरा होतो. पहिला दिवस भोगी म्हणून साजरा केला जातो. सर्व प्रकारचे राजसी भोग या दिवशी घेतले जातात. हरभरा, बोरे, गव्हाच्या ओंब्या असे पदार्थ देवापुढे नैवेद्य म्हणून अर्पण करून सर्व देवतांना पुजले जाते.
थंडीच्या दिवसांत आपल्या शारिरीक ऊर्जेचा स्तर कमी होत असतो. त्यामुळे सर्व प्रकारच्या शेंगभाज्या व फळभाज्या यांची मिळून मिश्र भाजी ही बाजरीच्या भाकरी सोबत खाल्ली जाते. तिळ व गुळ एकत्र करून लाडू व चिक्की बनवली जाते.
मकर संक्रांत सणाला पाच छोटी मडकी पूजण्याची प्रथा देखील पार पाडली जाते. भोगी दिवशी बनवलेला नैवेद्य हा मडक्यांमध्ये ठेवला जातो. तो नैवद्य आणि तिळगुळ एकमेकांना वाटून सर्वत्र स्नेह व गोडवा पसरवला जातो. तिळगुळ वाटताना “तिळगुळ घ्या गोड बोला” असे आवर्जुन बोलले जाते.
तुम्हाला मकर संक्रांत थोडक्यात माहिती (Makar Sankrant Mahiti Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…