प्रस्तुत लेखात इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क मधील एलटीई व व्हॉईस ओव्हर एलटीई (LTE And VoLTE Information In Marathi) या सुविधेबद्दल माहिती देण्यात आली आहे.
तुम्ही जर स्मार्टफोन वापरत असाल तर सध्याचे आधुनिक मोबाईल्स एलटीई आणि व्हॉईस ओव्हर एलटीई सुविधेने युक्त असतात. आपल्याला मोबाईल नेटवर्क शेजारी LTE/VoLTE असे लिहलेले आढळते. त्याचा संदर्भ किंवा अर्थ काय असेल? प्रत्येकाला याची माहिती असणे आवश्यक आहे.
वेळोवेळी नेटवर्कमध्ये 2G, 3G आणि 4G असे नेटवर्क बदल होत गेलेले आहेत. इंटरनेटचा वाढता वापर पाहून इंटरनेट डाटा स्पीड हा मुद्दा वारंवार महत्त्वाचा मानण्यात आला. परंतु आवाजाची आणि कॉलची गुणवत्ता कधीच लक्षात घेतली नाही.
LTE/VoLTE नेटवर्कचा उपयोग व्हॉईस कॉलिंगसाठी सर्वप्रथम जियो कंपनीने केला. कॉलिंग गुणवत्ता वाढवण्यासाठी ही प्रयोगशीलता खूपच फायदेशीर ठरली. इंटरनेटचा उपयोग कॉलिंगसाठी होऊ लागल्याने मोबाईल संवाद अतिशय सुविधापूर्ण होऊ लागला.
एलटीई आणि व्हॉईस ओव्हर एलटीई मधील मुख्य फरक – Difference Between LTE and VoLTE
एलटीईयुक्त नेटवर्कला कॉलिंग करण्यासाठी इंटरनेटची गरज भासते. ती समस्या वाटू लागल्याने व्हॉईस ओव्हर एलटीई नेटवर्क निर्मित करण्यात आले, यामध्ये कॉलिंगसाठी इंटरनेट कनेक्शन गरजेचे नाही.
एलटीईपेक्षा व्हॉईस ओव्हर एलटीई मध्ये जास्त सुविधा देण्यात आलेल्या आहेत. आवाजाची गुणवत्ता, एचडी कॉलिंग आणि हाय स्पीड इंटरनेट या सुविधांचा आपल्याला सहज लाभ होऊ शकतो.
एलटीई आणि व्हॉईस ओव्हर एलटीईची वैशिष्ट्ये – Features Of LTE and VoLTE
पूर्वीच्या GSM, CDMA नेटवर्कमध्ये पूर्णपणे क्रांती घडवून आणणारे एलटीई आणि व्हॉईस ओव्हर एलटीई नेटवर्क आता सर्व स्मार्टफोन्स वापरत आहेत.
एलटीई आणि व्हॉईस ओव्हर एलटीई नेटवर्क वापरण्यासाठी तुमचा मोबाईल हँडसेट 4G LTE/VoLTE supported असला पाहिजे.
LTE (Long Term Evolution)
• Download क्षमता – 100 Mbps
• Upload क्षमता – 50 Mbps
• संवाद साधण्यासाठी इंटरनेट आवश्यक.
VoLTE (Voice over Long Term Evolution)
• Download क्षमता – 150 Mbps
• Upload क्षमता – 100 Mbps
• संवाद साधण्यासाठी इंटरनेटची आवश्यक नाही.
• HD Video Call
LTE/VoLTE नेटवर्क मधील अडचणी –
• बॅटरीचा जास्त वापर होतो.
• इंटरनेट डाटा जास्त वापरला जातो.
• LTE/VoLTE network नसेल तर 2G/3G स्पीड खूपच कमी.
तुम्हाला एलटीई आणि व्हॉईस ओव्हर एलटीई (LTE And VoLTE Information In Marathi) हा लेख कसा वाटला? त्याबद्दल तुमचे मत नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा… धन्यवाद!