प्रस्तुत लेख हा जागतिक योग दिन (Jagatik Yog Din Swamat) या विषयावर आधारित स्वमत (स्वतःचे मत) आहे. जागतिक योग दिनाविषयी स्वतःचे काय मत आहे हे या लेखात सांगण्यात आलेले आहे.
स्वमत लिहताना बारा ते पंधरा ओळींत स्पष्टीकरण देणे अपेक्षित असते. तरीही स्वमत हा प्रश्न किती गुणांसाठी विचारला गेलेला आहे त्यावर सुद्धा स्वमत लेखन किती करायचे हे अवलंबून आहे.
जागतिक योग दिन (२१ जून) – स्वमत लिहा | World Yoga Day Self Opinion In Marathi
योग साधनेविषयी जनजागृती संपूर्ण जगभरात होण्यासाठी जागतिक योग दिन हा २१ जून रोजी साजरा केला जातो. आमच्या शाळेत नियमित योगासने घेत असल्याने मी योगाचे महत्व जाणतो. जागतिक योग दिनाची माहिती, रूपरेखा व स्वरूप सर्वांना माहीत व्हायला हवे.
योगासने किंवा योग साधना केल्याने सर्व लोक एक शांत, आनंदी आणि आरोग्यदायी जीवन जगू शकतात. योग जीवन पद्धती अंगिकारल्यास मानव जात वैयक्तिक विकास साधू शकतील. परिणामी आपापसांतील संघर्ष कमी होऊन सामाजिक विकास देखील शक्य होऊ शकेल.
भारतीय योग पद्धती आणि योग साधनेतील विविध क्रिया खूपच उपयोगी असल्याने मानवाचा शारिरीक, मानसिक व अध्यात्मिक विकास त्यामुळे शक्य आहे. योग संबंधित तंत्र हे भारतीय संस्कृतीत पूर्वीपासून उपलब्ध आहे. त्याचा उपयोग सद्य आणि भावी पिढ्यांनी नक्कीच करून घ्यावा, असे मला मनोमन वाटते.
तुम्हाला जागतिक योग दिन स्वमत लेखन मराठी (Jagatik Yog Din – Swamat Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…