जागतिक योग दिन – मराठी माहिती | Jagatik Yoga Din – Marathi Mahiti ||

प्रस्तुत लेख हा जागतिक योग दिनाविषयी मराठी माहिती (Jagatik Yoga Din – Marathi Mahiti) आहे. या लेखात योगा म्हणजे काय, जागतिक योग दिनाचे महत्त्व तसेच योग दिन कसा साजरा केला जातो याविषयी चर्चा करण्यात आलेली आहे.

जागतिक योग दिन माहिती | World Yoga Day Information In Marathi |

प्रश्न – जागतिक योग दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर – प्रत्येक वर्षी २१ जून रोजी जागतिक योग दिन साजरा केला जातो.

योगा म्हणजे काय? Yoga Meaning In Marathi

योगासने, योगजीवन, योगदृष्टी, योग साधना अशा योगाविषयीच्या विविध संकल्पना भारतात पूर्वीपासून प्रचलित आहेत. अध्यात्मिक क्षेत्रात विशेष गती करावयाची असल्यास योगा दृष्टीचा विचार आणि आचार अवलंबला जातो.

योगा म्हणजे एकात्मता! एकात्मता, एकता, एकात्मिकता अशा विविध संकल्पना देखील योगाबद्दल सांगता येतील. सर्व सजीवसृष्टी ही एकमेकांशी जोडली गेलेली आहे. त्याचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे योगा!

मानवी जीवनाची अत्यंत उच्च स्थिती योग दृष्टीने प्राप्त होऊ शकते. भारतात योगज्ञान अति प्राचीन काळापासून उपलब्ध आहे. अध्यात्मिक प्रक्रियेचा एक विशेष भाग म्हणून योगा या संकल्पनेचा उपयोग केला जातो.

योगामध्ये विविध योग सूत्रांचा वापर केला जातो. यम, नियम, प्रत्याहार, ज्ञान, आसन, भक्ती, ध्यान अशा बाबी त्यामध्ये समाविष्ट आहेत.

जागतिक योग दिन – २१ जून | World Yoga Day 21 June |

योगाभ्यास व योगाची संपूर्ण पद्धती सर्वांना माहीत व्हावी तसेच जगभरात योगाचा प्रसार व्हावा या हेतूने दरवर्षी २१ जून रोजी ‘जागतिक योग दिन’ साजरा केला जातो.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये २१ जून हा दिवस ‘जागतिक योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडला.

एकूण १९३ देशांपैकी १७५ देशांनी या प्रस्तावाला होकार दिला. सविस्तर चर्चेनंतर या प्रस्तावाला डिसेंबर २०१४ मध्ये संपूर्णपणे मान्यता प्राप्त झाली. २१ जून २०१५ रोजी पहिला ‘जागतिक योग दिन’ संपूर्ण जगभरात साजरा करण्यात आला.

जागतिक योग दिनाचे महत्त्व –

मानवी जीवनात शारिरीक, मानसिक आणि अध्यात्मिक स्तरांवर योगाने विकास घडवून आणता येतो. त्याचा प्रत्यय जे लोक योगा करतात त्यांना आलेला असतो. असे लोक योगप्रचार करण्यास अत्यंत योग्य व्यक्ती असतात.

संपूर्ण जगभरात योगप्रचार झाला तर मानवतेला भारत देश आणि योगा जीवन पद्धती ही सकारात्मक आणि शांततापूर्ण जीवनासाठी सहाय्यक ठरू शकेल.

वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणून २१ जून या दिवसाचे महत्त्व आहे. या दिवशी सूर्योदय लवकर होऊन सूर्यास्त उशिरा होत असतो. या दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. त्यामुळे याच दिवशी योग दिन साजरा होत असल्याने त्याचे भौगोलिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक मूल्य वाढते.

जागतिक योग दिन कसा साजरा केला जातो?

संपूर्ण जगभरात या दिवशी योगपूर्ण जीवन पद्धती अंगिकारण्याचे आवाहन केले जाते. जीवन सुखी, समृद्ध आणि आनंदी बनवण्यासाठी शरीर व मन योगयुक्त बनवले जाते. त्यासाठी योगासने, प्राणायाम, ध्यान यांचे महत्त्व या दिवशी समजावून सांगितले जाते.

योग दिनाची माहिती सर्वांना व्हावी व त्यानिमित्ताने जनजागृती व्हावी अशा उद्देशाने योग दिनाचे महत्त्व प्रसार माध्यमांद्वारे सर्वत्र पसरवले जाते. सोशल मीडिया व इंटरनेटचा वापर करून योग दिनाचे संदेश सर्वत्र पोचवले जातात. जागोजागी मोठमोठे फलक लावले जातात.

योगचिकित्सा, योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार अशा सर्व बाबींची माहिती सर्वांना व्हावी त्यासाठी शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये इत्यादी ठिकाणी योगाची व्याख्याने व प्रात्यक्षिके सादर केली जातात.

जागतिक योग दिन रूपरेखा (World Yoga Day Theme)

जागतिक योग दिनानिमित्त दरवर्षी विशिष्ट रूपरेखांचे आयोजन करण्यात येते. रूपरेखा समजून घेऊन त्यामागील उद्देश जाणून घेतला जातो आणि वर्षभर त्याचे पालन करण्यात येते. 

मागील काही वर्षांतील रूपरेखा पुढीलप्रमाणे आहेत

२०१७ – आरोग्यासाठी योग (Yoga for health)

२०१८ – शांततेसाठी योग (Yoga for Peace)

२०१९ – हृदयासाठी योग (Yoga for Heart)

२०२० – कौटुंबिक योग (Yoga at Home and Yoga with Family)

२०२१ – कल्याणकारी योग (Yoga for well-being)

२०२२ – मानवतेसाठी योग (Yoga for Humanity)

तुम्हाला जागतिक योग दिन – मराठी माहिती (Jagatik Yoga Din – Marathi Mahiti) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment