इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या क्रिकेट लीगचे कोण करणार, याबाबत झालेल्या लिलावात डिजनी स्टार (Disney Star) आणि वायकॉम 18 ने (Viacom18) ने बाजी मारली.
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने पुढील पाच वर्षांसाठी (2023 – 2027) मीडिया हक्क लिलाव ठेवला होता. त्यातील प्रक्रियेनुसार आयपीएल प्रसारण हक्कांची विक्री तब्बल 44 हजार 75 कोटींना झाली.
आयपीएलचे सामने हे स्टार स्पोर्ट्स या टीव्ही चॅनेलवर आणि ऑनलाईन सामने वूट (Voot) वर प्रसारित होतील. बीसीसीआयच्या सूत्रांनी ही सर्व माहिती पीटीआयला (PTI) दिली.
आयपीएल लिलावातील किंमती – IPL Media Rights Auction Price
• टीव्हीवर प्रसारणासाठीचे हक्क डिजनी स्टारने आपल्याकडे कायम ठेवले. त्यासाठी त्यांना 23,575 कोटी रुपये द्यावे लागले तर डिजीटल प्रसारणासाठीचे हक्क 20,500 कोटींना वायकॉम 18 या कंपनीने विकत घेतले.
• पुढील पाच वर्षांत आयपीएलचे एकूण 410 सामने खेळवले जातील. त्यातील सामन्यांसाठी या हक्कांची विक्रि झाल्याने एका सामन्यातून जवळपास 107 कोटींची कमाई बीसीसीआय करणार आहे. यामध्ये टीव्हीच्या माध्यमातून एका सामन्यांतून जवळपास 57 कोटी तर डिजीटल प्लॅटफॉर्मवर एका सामन्यातून 50 कोटींची कमाई बीसीसीआय करेल.