IPL 2023 _ CSK vs GT फायनल _ रिझर्व्ह डे

कोण उचलणार ट्रॉफी –

आज आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबाद, गुजरात येथे आज रात्री ठीक 7:30 वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. आयपीएल अंतिम सामना काल दिनांक 28 रोजी पावसामुळे खेळवला गेला नाही.

काय घडले काल ?

IPL 2023 चा अंतिम सामना 28 मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार होता. पण, अहमदाबादमधील पावसामुळे सामना होऊ शकला नाही आणि आज म्हणजेच रिझर्व्ह डेवर पोहोचला. पण, आजही अहमदाबादचे हवामान चाहत्यांसाठी चांगले संकेत देत नाहीये. होय, आजचा सामना पावसामुळे वाहून जाऊ शकतो.

सुपर ओव्हर किंवा 5 ओवर्सने होईल निकाल?

सोमवारी (२९ मे २०२३) अहमदाबादमध्येही पावसाचा अंदाज आहे. अशा स्थितीत रविवारप्रमाणे पावसामुळे सोमवारी सामना झाला नाही, तर चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील कोणता संघ ट्रॉफी जिंकेल, असे प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहेत.

खरं तर, राखीव दिवशीही पावसामुळे सामना विस्कळीत झाला आणि किमान 5 षटके खेळता आली नाहीत, तर शेवटी सुपर ओव्हरद्वारे विजेत्या संघाचा निर्णय घेतला जाईल. सुपर ओव्हर घेणे शक्य नसेल तर साखळी फेरीत पुढे असलेला संघ चॅम्पियन म्हणून निवडला जाईल म्हणजेच गुजरात टायटन्स ट्रॉफी जिंकेल.

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2023 चा अंतिम सामना राखीव दिवशी खेळवला जाणार आहे. पण, खराब हवामानामुळे सामना वाहून गेला, तर गुजरात टायटन्स संघ सामना न खेळताच ट्रॉफी उचलेल.

वास्तविक, सामना रद्द झाल्यास, साखळी सामन्यांच्या आधारे निर्णय घेतला जाईल. जर आपण पॉइंट टेबलवर नजर टाकली तर, GT 20 गुणांसह टेबल टॉपर होता, तर CSK चे फक्त 17 गुण आहेत. त्यामुळे पाऊस रद्द झाल्यास गुजरातचा संघ चॅम्पियन घोषित होईल.

Leave a Comment