स्पेस (मोकळीक) का आवश्यक! Importance Of Space In Life

माणूस हा संवेदनशील प्राणी आहे. तो बोलू शकतो, विचार करू शकतो, भावना व्यक्त करू शकतो, स्वतंत्र आणि मुक्त होऊ शकतो. माणसाला जसे हवे तसे तो जगू शकतो याचाच परिणाम आहे की तो वेगवेगळ्या परिस्थितीत किंवा नात्यांत स्वतःला मोकळा अनुभवू इच्छितो. त्यामुळे त्याला स्पेस आवश्यक वाटतो.

स्पेस म्हणजे काय ! What Is Space?

स्पेस (मोकळीक) जर एखाद्या व्यक्तीला मिळत गेली तर त्याचे सुप्त गुण बाहेर येतात. त्याचा सर्वांगीण विकास शक्य होतो आणि तो एकदम स्वतंत्र जगू लागतो. यासाठी माणसाचे मन कारणीभूत आहे. तो स्वतःला किती स्वतंत्र ठेवू इच्छितो ही त्याची इच्छाच त्याला स्पेस म्हणजेच मोकळीक मिळवून देते तीही आंतरिक!

आंतरिक म्हणायचं म्हणजे आपले विचार आणि भावना! जर आपण स्वावलंबी आणि स्वाभिमानी जीवन जगत असू तर इतरांना देखील तसेच जीवन देण्याचा प्रयत्न करू. स्वतः अशा स्वातंत्र्याचा अनुभव घ्यायला हवा त्यामुळे स्पेस स्वतःला किंवा इतरांना का मिळत नाही याचा विचार केला जाईल.

का मिळत नाही स्पेस?

कोणत्याही नात्यात स्पेस पाहिजे. असे आपण वारंवार ऐकत असतो. परंतु ती मोकळीक मिळणे कधी कधी अशक्य वाटते. कारण नात्यामध्ये करावी लागणारी कृती आपल्याला माहीत नसते. आपला आळशीपणा वारंवार वर येत राहतो आणि नात्यात वाजवीपेक्षा जास्त अपेक्षा ठेवली जाते.

आपल्याला प्रत्येक नाते असे वाटते की आपल्या मनाप्रमाणे असले पाहिजे. त्यामुळे इतरांच्या आवडीनिवडी आणि वेगळेपण न पाहता आपण त्यांच्या जगण्यात फक्त कुरघोडी करत राहतो. आपला ज्या गोष्टीला विरोध असेल मग तीच कृती समोरचा व्यक्ती करत राहतो. मनातून एक प्रकारची ईर्ष्या आणि तेढ निर्माण होते.

स्वतः व्यतिरिक्त सर्व नात्यांत आपण कोणाकोणाशी जोडले गेलो आहोत ते आपल्याला समजले पाहिजे. त्यामध्ये करावी लागणारी कृती किंवा असणारी जबाबदारी ही ठरवली गेली पाहिजे मग स्वतः साठी काही मोकळा वेळ आणि एकटेपण तुम्ही निवडू शकता.

स्पेस मिळण्याची सुरुवात –

सर्वप्रथम नात्यात जुन्या काही संकल्पना, विचार, समजुती असतील ज्यामुळे सर्वांना त्रास होत आहे त्या वेगळ्या करा. नकारात्मक भावनांचा निचरा होऊ द्या. त्यासाठी सतत विधायक विचार आणि भाव करत राहणे आवश्यक आहे.

त्यानंतरची पायरी म्हणजे काही वेळ एकटे राहण्याचा प्रयत्न करा. ज्यामध्ये फक्त स्वतःचे मन आणि स्वभाव अनुभवा. स्वतःचे विचार पाहायला सुरुवात करा. त्यामुळे तुमची तुम्हालाच ओळख पटत जाईल. आयुष्यातील सर्व प्रश्न सुटत जातील.

हाच वेळ वाढवत नेलात की कळेल, आयुष्यात स्पेस ( मोकळीक ) किती आवश्यक आहे. कुटुंब, नाती, एकत्र सहवास, जेवढा आवश्यक आहे तेवढाच स्पेस ही आवश्यक आहे. तो प्रत्येकाच्या जीवनात असलाच पाहिजे.

इतरांना स्पेस कसा द्याल?

तुम्हाला स्वतःला स्पेसचे महत्त्व योग्यरीत्या कळल्याशिवाय इतरांना तसा स्पेस देणे शक्य होणार नाही. प्रत्येक नवीन नात्यात सुरुवातीला खूप छान वाटते पण हळूहळू कंटाळा येऊ लागतो. मन चंचल असल्याने वारंवार त्याच गोष्टी पूनरुक्त करणे नकोसे होते पण स्पेस स्वतःला आणि दुसऱ्याला दिल्याने आपल्याला मनाचा स्वभाव कळतो.

आपण मग इतरांचे महत्त्व तर जाणतोच शिवाय इतर व्यक्तींचे आपल्या आयुष्यातील स्थान किती महत्त्वाचे आहे हेदेखील आपल्याला कळते. त्यामुळे दुसरा व्यक्ती आपल्यापासून स्वतंत्रच आहे आणि आपणही! फक्त मिळणारी मोकळीक ही आणखी वेळखाऊ प्रक्रिया नसली पाहिजे तर तो स्वतःचा स्वतःशी घडलेला संवाद असला पाहिजे.

सतत मोकळीक मिळत गेल्यास तुम्ही इतरांना देखील मोकळीक प्रदान करता. त्यासाठी अवास्तव जीवनाच्या संकल्पना ध्यानी ठेवायच्या नाहीत. व्यर्थ अपेक्षा आणि आकांक्षा करायच्या नाहीत. दुसऱ्याच्या कामात आणि आयुष्यात त्याच्या परवानगीशिवाय ढवळाढवळ करायची नाही.

स्पेस नक्की कसा असावा –

एखाद्या रिकाम्या खोलीत शांत बसणे.

निर्जन स्थळी विहार करणे किंवा फिरायला जाणे.

आठवड्यातील / दिवसातील काही वेळ एकांत वेळी शक्य असल्यास ध्यान करणे.

दिवसभर स्वतःचे मनातले विचार पाहणे.

वरील सर्व उपाय हे सुरुवातीला एक वेडसर कल्पना वाटेल पण एकदा सर्व उपाय करून पाहिल्यावर खरा स्पेस तुम्हाला अनुभवात येईल. त्यामध्ये जो आनंद आहे तो कुठल्याच नातेसंबंधात कुठलाच व्यक्ती तुम्हाला प्रदान करू शकणार नाही.

Leave a Comment