Masala Dosa Recipe in Marathi | मसाला डोसा बनवण्याचा सोप्पा विधी.

मसाला डोसा कोणाला आवडत नाही. आजकाल हॉटेल्स मध्ये गेल्यावर मसाला डोसा आवडीने ऑर्डर केला जातो. मसाला डोसा नाश्त्यासाठी एक उत्तम पदार्थ आहे. या पदार्थाला चव ही चांगली आहे आणि मस्तपैकी खाताना आस्वाद देखील घेता येतो. चला तर मग जाणून घेऊ कसा बनवाल हा मसाला डोसा घरच्या घरी तेही कमीत कमी वेळेत !

Masala Dosa recipe ingredients
साहित्य –

‘ डोसा ‘ साठी लागणारे साहित्य –
१. तांदूळ – ३ वाटी.

२. उडीद डाळ – १ वाटी.

३. चणा डाळ – अर्धी वाटी.

४. जिरे – अर्धा चमचा.

५. चवीपुरते मीठ.

मसाला बनवण्यासाठी साहित्य –

१. उकडलेले मोठे बटाटे – २

२. बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या – ३

३. कांदा १

४. उडीद डाळ १ चमचा

५. तेल – २ चमचे

६. आले पेस्ट – अर्धा चमचा

७. जिरे – अर्धा चमचा

८. हळद – अर्धा चमचा

९. मोहरी आणि हिंग – चिमूटभर

१०. कढीपत्ता – ५

How to make Masala Dosa Recipe
कृती:

‘ डोसा ‘ साठी कृती –
१. तांदूळ, उडीद डाळ, चणा डाळ वेगवेगळी धुवून ५ ते ६ तास पाण्यात भिजत ठेवा.

२. सर्व पदार्थातील पाणी व्यवस्थित काढून टाकून मिक्सरमध्ये वेगवेगळे बारीक करून घ्यावे. थोडेसे मीठ आणि जिरे टाकून हे सर्व मिश्रण एकत्र करावे. चांगले १० ते १२ तास आंबवून घ्या.

३. किंचित मीठ आणि पाणी टाकून मिश्रण चांगले ढवळून घ्या. मिश्रण चांगले एकसंध झाले पाहिजे.

४. आता गॅसवर तवा ठेवा. डोसे तयार करण्यासाठी नॉनस्टिक तवा वापरावा. तव्याला तेल न लावता व्यवस्थित पळीने डोसा पीठ पसरवा. थोडा लालसर रंग आला की बाजूने तेल सोडा.

मसाला बनवण्याची कृती –

मसाला म्हणजेच बटाटा भाजी तयार केली जाते.

१. उकडलेले बटाटे साली काढून बारीक चिरून घ्या.

२. कांदा बारीक चिरून घ्या.

३. आता कढईत किंवा खोलगट भांड्यात २ चमचे तेल गरम करावे. मोहरी, जिरे, हिंग, हळद, आले पेस्ट, कढीपत्ता घालून चांगले परतून घ्यावे. त्यात थोडी उडीद डाळ घालावी.

४. त्यामध्ये हिरव्या मिरच्या चिरून घालाव्या. नंतर बारीक चिरलेला कांदा परतून घ्या. नंतर चिरलेले बटाटे आणि कोथिंबीर टाकावी. मिश्रण व्यवस्थित परतून घ्या. मसाला तयार झाला की ‘ डोसा ‘ सोबत सर्व्ह करा.

५. तुम्ही नारळाची चटणी किंवा सांबार सोबत देखील मसाला डोसा सर्व्ह करू शकता.

टीप:

१. डोसा पीठ जास्त घट्ट किंवा पातळ होऊ देऊ नका.
२. आधी मसाला तयार करून घ्या. नंतर डोसे बनवा.

हे देखील वाचा – Chicken Dum Biryani Recipe in Marathi | आस्वाद घेऊन तर पहा.

Leave a Comment