Gulkand Recipe in Marathi | गुलकंद बनवा घरच्या घरी !

गुलकंद रेसिपी (Gulkand Recipe) बनवण्यासाठी खूपच सोपा आहे. आयुर्वेदिक महत्त्व असणारा हा गुलकंद खूप मोठ्या प्रमाणावर केल्यास जोडधंदा बनू शकतो. गुलकंद खासकरून उन्हाळयात खातात. गुलकंद बनवण्यासाठी देशी लाल गुलाब वापरावेत. गुलाब शेती वाढवून तुम्ही हा पदार्थ बाहेरही विकू शकता. खडीसाखर आणि गुलाब पाकळ्या वापरून हा पदार्थ बनवला जातो.

उन्हाळ्याचा होणारा दाह कमी करण्यासाठी डॉक्टर, वैद्य आवर्जून गुलकंद सेवनाचा पर्याय सांगतात.

Gulkand Recipe Ingredients
साहित्य –

१. गुलाब पाकळ्या
२. खडी साखर – १ किलो ग्रॅम

How to make Gulkand Recipe –
कृती :

१. गुलाबाच्या लाल पाकळ्या वेगळ्या कराव्यात. पाकळ्यांचे बारीक तुकडे करावेत.

२. एक कमी जाडीचा थर खडीसाखर आणि एक थर गुलाबाच्या पाकळ्या अशा एकत्र काचेच्या बरणीत साठवून ठेवा. एका बरणीत एकावर एक ९ – १० थर होतील एवढी बरणी वापरावी.

३. काचेची बरणी कमीत कमी ५ दिवस तरी उन्हात ठेवावी. उन्हात ठेवल्यामुळे साखरेचे पाणी होते आणि गुलाबाच्या पाकळी मध्ये मस्त मुरते.

४. तीन आठवड्यानंतर गुलकंद खाण्यायोग्य बनतो.

टीप –
कुठलाही सुकामेवा म्हणजे बदाम , अक्रोड , काजू , शेंगदाणे यांचे तुकडे मिक्स करू शकता.

गुलकंदाचे फायदे –

१. पचन क्रिया सुधारते –
गुलकंद खाल्ल्याने पचनक्रिया सुधारू शकते. तुम्हाला जर पोटाचे विकार, समस्या असतील तर गुलकंद तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल.

२. उष्णता कमी करते –
शरीरातील अनावश्यक उष्णता गुलकंद खाल्ल्याने कमी होते. उष्णतेच्या त्रासामुळे होणारे अनेक आजार , त्वचाविकार यामध्ये गुलकंद गुणकारी आहे.

( हा लेख संदर्भानुसार लिहला आहे. गुलकंद जर तुम्ही रोगनिदान म्हणून सेवन करणार असाल तर त्याचे प्रमाण व सेवन कसे करावे, याचा सल्ला तज्ञांकडून घ्यावा.)

Leave a Comment