देवा तुझे किती सुंदर आकाश प्रार्थनेचे बोल • Deva Tujhe Kiti Sundar Akash

देवा तुझे किती – प्रार्थना • Deva Tujhe Kiti Prarthana

देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर पडे त्याचे

सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे
किती गोड बरे गाणे गाती

सुंदर वेलींची सुंदर ही फुले
तशी आम्ही मुले देवा तुझी

इतुके सुंदर जग तुझे जर
किती तू सुंदर असशील

Leave a Comment

close