सातारा, सांगली, कोल्हापुरात अतिवृष्टी झाली असून बहुसंख्य भागात पाणी साठलेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बऱ्यापैकी सर्वच तालुक्यांना अतिवृष्टी चा फटका बसला असून तिथे जनजीवन विस्कळित झाले आहे. यामध्ये कोल्हापूर शहराचा सुध्दा समावेश आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा, शिराळा,पलूस तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे, तर सातारा जिल्ह्यातील कराड,पाटण, महाबळेश्वर तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.
कोल्हापुरात महापूराने हाहाकार माजविला आहे. लोकांच्या घरात पाणी गेल आहे. संपूर्ण गावे ही पाण्याखाली आली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या कमतरतेमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. पुणे-बेंगलोर हायवे सुध्दा पाण्याखाली आला असून त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
शहराचा बाहेरच्या लोकांशी संपर्क तुटला आहे व पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी प्रशासन सर्वतरीने प्रयत्न करत आहे. सांगली मधील ज्या चार तालुक्यात अतिवृष्टीमुळे महापूर आला आहे त्याठिकाणी प्रशासन लोकांना सुरक्षित स्थळी हलवत आहे तसेच लोकांना जीवनावश्यक वस्तू पुरवल्या जात आहेत. याठिकाणी आज सकाळी बोट बुडून १४ नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यासाठी सरकारने प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पाकिस्तानात गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार! असे आहे अजित डोभाल यांचें रोमांचित करणारे जीवन.
सातारा जिल्ह्यात प्रामुख्याने कराड व पाटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे लोकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. पण सातारा जिल्ह्यातील परिस्थिती जरा वेगळी आहे इथे पुराबरोबरच डोंगर खचने, घरे पडणे, घरांना चिरा पडणे, भिंती पडणे, रस्ता खचणे, दरड कोसळणे, शेतजमिनीचे नुकसान होणे अशा परिस्थितीनं लोक सामोरे जात आहेत. प्रशासनाकडून यासाठी मदत पुरवण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील १२००० कुटुंबातील ५१ हजार लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले असून सांगली जिल्ह्यातील ११००० कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व बंधारे व धरणे १०० टक्के भरली असून सांगलीतील सगळे मिळून अंदाजे २५ रस्ते पाण्याखाली आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात ६ NDRF ची पथके , १ इंडियन नेव्ही चे पथक, टेरिटोरियल आर्मी ची ४ पथके, तसेच इंडियन अर्मीची काही पथके इथे बाचव कार्य करीत असून महापुरामुळे लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रशासनाला करत करावी लागत आहे. कोल्हापूर प्रमाणे सांगली जिल्ह्यातील तालुक्यात सुध्दा ही सर्व पथके तैनात करण्यात आली आहेत. सातारा जिल्ह्यातील कराड व पाटण तालुक्यात NDRF ची पथके तैनात करण्यात आली असून लोकांना सुरक्षित स्थळी हलविणे सुरू आहे.
महापूर नियंत्रित करण्यासाठी कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या मधून पाणी विसर्ग करण्यासंबंधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येदुरप्पा यांच्याशी चर्चा केली व त्यामुळे ५ लाख क्युसेस पाणी सोडण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला असून भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी सुध्दा या दोन्ही मुख्यमत्र्यांसोबत फोन वर चर्चा केली आहे व लागेल ती मदत पुरवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.