अंजीर फळ संपूर्ण माहिती! Fig Fruit Information In Marathi |

प्रस्तुत लेखात अंजीर फळाबद्दल संपूर्ण माहिती (Fig Fruit Information In Marathi) सांगण्यात आली आहे. अंजीर हे गोड – आंबट स्वरूपाचे लालसर रंगाचे फळ असते.

अंजीर हे फळ शरीरासाठी अतिशय उपयुक्त असे फळ आहे. अति दुर्लभ आणि शरीरासाठी पोषक अशी जीवनसत्त्वे अंजीर फळात आढळतात. त्यामुळे त्याचे नियमित सेवन म्हणजे दीर्घकालीन आरोग्य प्राप्तीच आहे.

अंजीर फळ माहिती | Anjeer Marathi Mahiti |

• अंजीर वृक्ष “मोरेसी” कुळातील असून त्याचे शास्त्रीय नाव “फायकस कॅरिका” असे आहे.

• अंजीर या वृक्षाची उंची ३ ते १० मी. पर्यंत असते. झाडाच्या फांद्या राखाडी रंगाच्या असतात.

• अंजीर फळाचे एकूण चार प्रकार पडतात. सामान्य (युरोप), स्मर्ना, रानटी, सान पेद्रो (कॅलिफोर्निया) असे त्याचे चार प्रकार आहेत.

• अंजीर फळाचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. शरीरास आवश्यक असणारी बहुतांश जीवनसत्त्वे अंजीर फळात आढळतात. अंजिरात तंतूमय पदार्थ अधिक प्रमाणात असतात.

• अंजीर फळापासून कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशियम, बीटा कॅरोटीन आणि ‘क’ जीवनसत्त्व मिळते.

• अंजीर फळाचे इराण, टर्की, पोर्तुगाल, इटली, ग्रीस, अफगाणिस्तान हे महत्त्वाचे उत्पादक देश आहेत.

• भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, आणि तमिळनाडू या राज्यात अंजीर फळाचे उत्पन्न घेतले जाते.

अंजीर फळाची उपयोगिता / वैशिष्ट्ये –

• अंजीर पिकल्यावर आणि सुकवल्यावर खाऊ शकतो.

• सुक्या अंजिराची प्रतवारी त्यांच्या रंगावरून आणि आकारावरून ठरवतात.

• अंजीर फळाचा मुरांबा आणि बर्फी देखील बनवली जाते.

अंजीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे –
(Anjeer Health Benefits in Marathi)

• अंजीर आरोग्याला अतिशय फायदेशीर असल्याने नियमित सेवन करण्याचा सल्ला आहारतज्ञ देतात.

• अंजीर फळामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अशक्तपणा दूर होण्यास मदत होते.

• अंजीर बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत करते.

• अंजीरमध्ये फायबर असल्याने पोट साफ होण्यास मदत होते. पचनशक्ती सुधारते आणि सतत भूक लागण्याचे प्रमाण कमी होते.

• अंजीरमध्ये असणारे कॅल्शिअम हाडांना बळकटी प्रदान करते. हाडे कमकुवत आणि ठिसूळ होण्याचा धोका खूप कमी होतो.

• पिकलेले अंजीर नियमित सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि रक्त शुद्ध होत जाते.

• अंजीर खाल्ल्याने व्यसनामुळे शरीराची झालेली हानी भरून निघते. नवीन ऊर्जा प्राप्त होते.

• अंजीर फळात ओमेगा 3 आणि ओमेगा 6 हे घटक आढळतात ज्यामुळे हृदय विकार जडण्याची शक्यता खूप कमी असते. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना देखील अंजीर सेवनाचा फायदा होतो.

• अंजीर सेवनाने पित्त आणि वात विकार देखील दूर होतात.

• कच्च्या अंजिराचा चिक लावल्याने पायाच्या भेगा लवकर बऱ्या होतात.

• अंजीर फळात असणारे पोटॅशियम रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते.

• अंजिराची पाने पाण्यामध्ये उकळून ते पाणी प्यायल्याने शरीरातील चरबी नियंत्रणात राहते.

• अंजीर दुधामध्ये भिजवून खाल्ल्याने वजन वाढण्यास मदत होते.

• अंजिराचे सेवन केल्याने महिलांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता खूप कमी असते.

• डांग्या खोकला आणि दमा या दीर्घकालीन आजारात अंजिराचे सेवन फायदेशीर ठरते.

महत्त्वाची टीप –

कोणताही घटक अति सेवन केल्याने नुकसानकारक ठरतो तसेच अंजीराचे अति सेवन देखील नुकसानकारक ठरू शकते. जर कोणता आजार असेल तर अंजिराचे सेवन वैद्यकीय सल्ल्यानुसार करावे.

संपूर्ण लेख हा संदर्भ लेखन आहे. तुम्हाला अंजीर फळ संपूर्ण माहिती (Fig Fruit Information In Marathi) हा लेख आवडला असल्यास आणि त्यामध्ये कोणताही चुकीचा सल्ला आढळल्यास त्याची नोंद कमेंट बॉक्समध्ये करावी.

Leave a Comment