Ezoic – मराठी माहिती | Ezoic Information in Marathi |

प्रस्तुत लेख हा Ezoic वर आधारित मराठी माहिती (Ezoic Marathi Mahiti) आहे. ज्यांना स्वतःच्या वेबसाइटवरून अधिक कमाई करायची आहे, त्यांनी Ezoic हा पर्याय नक्कीच वापरून पहावा.

या लेखात Ezoic म्हणजे काय आणि Ezoic मंजूरी कशी मिळवायची आणि Ezoic चे फायदे काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

Ezoic म्हणजे काय? Ezoic meaning In Marathi |

• Ezoic हे एक उत्तम जाहिरात नेटवर्क आहे ज्याला Google ने देखील मान्यता दिलेली आहे. इझोइकची प्रसिद्धी आणि फायदे पाहता त्याला adsense सोबत जोडले जाणे हे आवश्यक झालेले आहे, असे अनेक ब्लॉगर्स मानत आहेत.

• तुम्ही adsense वापरत असाल तर तुम्ही ezoic मधून तुमची कमाई दुप्पट करू शकता. AdSense साठी CPC चांगला मिळत नसेल तर तुम्ही Ezoic चा पर्याय जरूर निवडावा.

• Ezoic तुमच्या साइटनुसार उच्च दराच्या जाहिराती पुरवते जेणेकरून तुमची कमाई देखील खूप चांगली होऊ शकते.

• जर तुमच्या वेबसाइटवर adsense मंजूर झाला असेल आणि तुमच्या वेबसाइटला दररोज तीनशे जरी views मिळत असतील, तरीही तुम्ही तुमच्या साइटला Ezoic मध्ये मंजूर करून घेऊ शकता.

• तुमच्याद्वारे अपलोड केलेली, वेबसाईटवरील सर्व माहिती मूळ तुमचीच असावी (कॉपी केलेली नसावी), तसेच तुम्हाला Google Ad चे सर्व नियम पाळावे लागतील मगच तुम्हाला तुमच्या वेबसाईट अथवा ब्लॉगसाठी Ezoic मान्यता देऊ शकते.

• Ezoic वेबसाइटच्या कंटेंटनुसार जाहिरातींचे प्लेसमेंट करते आणि वेबसाइटवर उच्च CPC जाहिराती प्रदान करते.

•  Adsense प्रत्येक महिन्याच्या 21 तारखेला पेमेंट देत असते, त्याच प्रकारे Ezoic महिन्याच्या 28 ते 30 तारखेपर्यंत पेमेंट देते.

इझोइक कसे कार्य करते ? How Ezoic Works?

इझोइक हे AI (Artificial Intelligence) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने कार्य करते. Google प्रमाणित असल्यामुळे Ezoic पूर्णपणे ऑप्टिमाइझ केलेल्या आणि उच्च cpc असलेल्या जाहिराती सुचवते. Ezoic आपल्याला उच्च दराच्या जाहिराती प्रदान करते जे प्रकाशकासाठी खूप चांगले आहे.

इझोइकचे फायदे – Ezoic benefits in Marathi |

• Ezoic एक जाहिरात नेटवर्क प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही Ezoic च्या मदतीने तुमच्या ब्लॉग अथवा वेबसाईटसाठी कमाई करू शकता.

• जर तुम्ही अ‍ॅडसेन्ससह इझोइक वापरत असाल, तर तुम्ही अ‍ॅडसेन्सपेक्षा इझोइकच्या मदतीने अनेक पटीने अधिक उत्पन्न मिळवू शकता.

• Ezoic आपल्या वेबसाइटवर उच्च CPC असलेल्या जाहिराती दाखवते.

• Ezoic मध्ये अप्रूव्हल (Approval) मिळवणे खूप सोपे आहे.

• Ezoic वर $20 पूर्ण केल्यानंतर लगेच पेमेंट मिळते.

• Ezoic मध्ये, तुम्हाला Ad tester, Layout Tester, Google Amp Converter, Big Data Analytics सारखी अनेक advanced features पाहायला मिळतात.

Ezoic साठी अर्ज कसा करावा? How to apply for Ezoic

1. तुम्हाला ezoic.com वर जाऊन तुमचे खाते तयार करावे लागेल.

2. तुम्हाला तुमचे डोमेन तिथे जोडून तुमच्या डोमेनची पडताळणी करावी लागेल.

निष्कर्ष – Ezoic हे Google ने मंजूर केलेले जाहिरात नेटवर्क आहे जे Adsense सोबत काम करते, तुम्ही Adsense वापरत असाल तर तुम्ही Ezoic वापरू शकता. तुम्ही Ezoic वापरून तुमची कमाई वाढवू शकता.

(तुम्ही Ezoic चे पेमेंट फक्त Paypal आणि Payoneer वर घेऊ शकता.)

तुम्हाला इझोईक – मराठी माहिती (Ezoic Information in Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment