व्यायाम आणि योगा (Exercise(Gym) and Yoga) हे दोन्हीही प्रकार शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मिळवून देतात परंतु त्यांचे वेगवेगळे आयाम आहेत. जिम ही संकल्पना अलीकडे अति प्रचारित होत आहे.
बहुतेक तरुण तरुणींना जिम आकर्षित करते. तर योगा हा धार्मिक लोकांसाठी असतो, तो उतारवयात किंवा आजारी व्यक्तींनी करायचा असतो अशी धारणा तयार होऊ लागली आहे.
प्रस्तुत लेखात आपण जाणून घेणार आहोत की नक्की दोन्हींचे फायदे काय आहेत आणि तोटे काय असू शकतील.
Table of Contents
व्यायाम करण्याचे फायदे – Advantages Of Exercise
ज्या व्यक्तींना पिळदार आणि मजबूत शरीरयष्टी हवी असते त्यांना व्यायाम हा योग्य प्रकार आहे. एक प्रकारे कष्टाचं काम असल्याने त्यामध्ये शरीरातील घामावाटे विषारी घटक बाहेर पडतात. स्नायू, सांधे आणि हाडे बळकट बनतात.
व्यायाम केल्याने अतिरिक्त चरबी निर्माण होत नाही. शारीरिक काम करण्याची चपळता आणि सातत्य येऊ लागते. तो व्यक्ती स्वतःला सतत उत्साही आणि उर्जावान अनुभव करतो.
व्यायाम केल्यानंतर रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि कोणताही आजार जडणे अशक्य होते. शरीर आणि मन एक प्रकारे संतुलित राहण्यास मदत होते.
व्यायाम करताना घ्यावयाची काळजी –
व्यायाम करताना आपल्या शरीराची ताकत आणि कुवत आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. अतिरिक्त भार (वजन) उचलण्याचा प्रयत्न केल्यास शारिरीक ईजा होऊ शकते. मणका, मान, खांदे व सांध्यांना त्रास होऊ शकतो.
अति पिळदार शरीर बनवण्याचा प्रयत्न करू नये. कारण शरीराची लवचिकता त्यामुळे नाहीशी होते. अंतर्गत लवचिक स्नायूंना ईजा पोहचू शकते.
योगा करण्याचे फायदे – Yoga Benefits
योगा ही एक जीवनशैली आहे. योगा म्हणजे एकता. अत्युच्च अध्यात्मिक अनुभवाला प्राप्त होताना आणि साधना करत असताना शरीराला आणि मनाला तयार केले जाते.
एखादे योगासन करून त्याच स्थितीत श्वसनाच्या पद्धतीवर काम करून शारीरिक आणि मानसिक स्थिरता अनुभवली जाते. आपले अस्तित्व त्या दोन्हीच्या पलिकडे आहे याची प्रचिती घेण्यास सुरुवात होते.
आजकाल फॅशन म्हणून योगा केला जातो. त्याचे अधिष्ठान किंवा त्याचा उद्देश्य विसरला गेला आहे. सर्वांना वाटते आजार जडला की योगा करतात पण तसे नाही.
योगासने केल्यावर शारीरिक आणि मानसिक फायदे होतात, तो योगा करण्याचा परिणाम आहे पण योगाचे ते लक्ष्य नाही. शरीराबद्दल आपण जास्त सजग होण्यासाठी आणि शारिरीक बंधनापलिकडे जाण्यासाठी योगा ही जीवन पद्धती अवलंबली जाते.
तरीही योगा केल्याने अनेक असाध्य रोगांवर मात करणे शक्य आहे आणि मानसिक शांती देखील लाभते.
योगा करताना घ्यावयाची काळजी –
योगा हा कुठला व्यायाम प्रकार नाही हे सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे अध्यात्मिक गुरु किंवा योगा गुरूच्या सानिध्यात योगा शिकणे आवश्यक आहे.
व्यक्ती तशी प्रकृती –
काही लोकांना मानसिक शांती हवी असते तर काहींना मजबूत शरीरयष्टी. ज्यांना मानसिक स्थिरता, स्वास्थ्य व शारिरीक लवचिकता हवी असेल त्यांनी योगा शिकणे फायदेशीर ठरेल तर ज्यांना शारिरीक स्वास्थ्य, शरीराची स्ट्रेंथ हवी असेल, त्यानुसार ते व्यायामाची निवड करू शकतात.
तुम्हाला व्यायाम की योगा (Exercise Or Yoga) हा लेख आवडला असल्यास त्याबद्दल तुमचा अभिप्राय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा…