शाहरुखला गौरवण्यात येईल ‘एक्सेलेन्स इन सिनेमा’ पुरस्काराने.

मेलबर्न येथे होणार्‍या भारतीय चित्रपट महोत्सवाच्या पुरस्कार सोहळ्यादरम्यान व्हिक्टोरियन राज्यपाल लिंडा डेसाऊ हा पुरस्कार शाहरुख ला प्रदान करतील. शाहरुख खान या सोहळ्यात प्रमुख अथिति म्हणून उपस्थित राहणार आहे.

मेलबर्न येथे भारतीय चित्रपट महोत्सवाच्या पुरस्कार सोहळ्यादरम्यान सुपरस्टार शाहरुख खानला 8 ऑगस्टला ‘एक्सलन्स इन सिनेमा’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. शाहरुख खानला सिनेमात आणि भारतातील लोकप्रिय संस्कृतीत आपले महत्वपूर्ण योगदान देण्यासाठी त्याला या पुरस्काराद्वारे सन्मानित करण्यात येईल.

शाहरुख खान या समारंभाला प्रमुख अथाति म्हणून उपस्थित राहणार असून, त्याला व्हिक्टोरियाच्या राज्यपाल लिंडा डेसाऊ यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. डेसाऊ व्हिक्टोरिया राज्यातील पहिल्या महिला राज्यपाल आहेत. शाहरुख खान ने एका निवेदनात म्हटले आहे की मी हा पुरस्कार नम्रतेने स्वीकारतो आणि मला याचा सन्मान वाटतो.

शाहरुख खान ला याआधी सुद्धा अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच तो जगभरात एक नावाजलेला कलाकार म्हणून लोकप्रिय देखील आहे म्हणून हा त्याच्या मानाच्या तुऱ्यात अजून एक तुरा नक्कीच ठरेल.

नक्की आहे तरी काय, हे कलम ३७0 व ३५ (अ)

Leave a Comment