असंघटित कामगारांची खूपच मोठी समस्या सोडवत केंद्र सरकारने त्यांच्यासाठी ई-श्रम योजना (E-Shram Yojana) चालू केलेली आहे. ई-श्रम योजनेबद्दल आपल्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे या लेखात दिलेली आहेत.
Table of Contents
ई-श्रम पोर्टल काय आहे? What is E-Shram Portal in Marathi
असंघटित कामगारांना एका पातळीवर आणण्यासाठी ऑनलाईन नोंदणी चालू करण्यात आली. ऑनलाईन नोंदणी होत असलेल्या संकेतस्थळाला ई-श्रम पोर्टल म्हणतात.
ई-श्रम योजना का सुरू करण्यात आली?
कोरोना काळात असंख्य कामगारांच्या कामावर बंदी आल्याने ते अचानक बेरोजगार झाले. ते कोणत्याही ठिकाणी संघटित नसल्याने त्यांची कामाची आणि असंघटित असल्याची समस्या खूप मोठ्या स्तरावर दिसून आली.
हि अडचण समजून घेऊन केंद्र सरकारने अशा कामगारांच्या भल्यासाठी ई – श्रम योजना चालू केली.
ई-श्रम कार्ड म्हणजे काय? What is E-Shram Card in Marathi
ई-श्रम योजने अंतर्गत ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर कामगारांना 12 अंकी नंबर असलेले लेबर कार्ड दिले जाईल ज्यामध्ये व्यक्तीचे संपूर्ण नाव, व्यवसाय, पत्ता, शिक्षण, कौशल्य आणि कौटुंबिक माहिती दिलेली असेल.
या कार्डमुळे कामगारांना स्वतःच्या राज्यात शिवाय संपूर्ण देशभरात सरकारी योजनांचा लाभ मिळू शकेल ज्यांतर्गत त्यांच्या उदर निर्वाहाची समस्या सोडवली जाईल. तसेच भविष्यात कोरोनासारख्या गंभीर संकटात त्यांच्या कुटुंबाला अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
ई-श्रम योजनेचे फायदे | E-Shram Yojaneche Fayade |
• संपूर्ण देशभरात असलेले बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित कामगार, रस्त्यावरील विक्रेते, आणि इतर कामगार या सर्वांना मुख्य प्रवाहात आणणे. म्हणजेच जेवढे असंघटित कामगार आहेत त्यांना संघटित करणे.
• कामगारांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे.
• अडचणीच्या काळात देखील त्यांच्या कौशल्याचा त्यांना फायदा होईल याचा भविष्यात या कार्डमुळे विचार केला जाईल.
ई-श्रम पोर्टलवर नोंदणी कशी करावी? How to Register on E-Shram Portal
• ई-श्रम कार्ड नोंदणी करण्यासाठी, सर्वप्रथम https://www.eshram.gov.in ही लिंक ओपन करा.
• यानंतर Register on e-shram या ऑप्शनवर क्लिक करा.
• त्यानंतर आधार कार्डची नोंद करावी व कॅप्चा कोड भरून मोबाईल क्रमांक द्यावा. काही वेळात रजिस्टर केलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. ओटीपी भरल्यानंतर तुमची नोंदणी व्हेरिफाय केली जाईल.
• त्यानंतर पुढील पेजवर वैयक्तिक माहिती भरून रजिस्टर ऑप्शनवर क्लिक करा.
• ई-श्रम पोर्टलवर नोंदणीसाठी आधार कार्ड, बँक खात्याची माहिती, मोबाईल क्रमांक आणि पासपोर्ट साईज फोटो इ. कागदपत्रे आवश्यक आहेत.
• यामध्ये मोबाईल क्रमांक हा आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे. अतिरिक्त माहिती आणि समस्यांचे निराकरण होण्यासाठी हेल्पलाइन नंबर 14433 देण्यात आलेला आहे.
प्रस्तुत लेख ई-श्रम कार्ड योजना – मराठी माहिती (E-Shram Yojana Marathi Mahiti) तुम्हाला आवडला असल्यास नक्की तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा…