प्रस्तुत लेख हा डिजिलॉकर विषयी मराठी माहिती (Digilocker information in Marathi) आहे. डिजीलॉकर काय आहे, त्याचा उपयोग आणि कार्य अशा बाबींची चर्चा या लेखात करण्यात आलेली आहे.
सध्या डिजिटल इंडिया ही संकल्पना रुजू होत आहे. सर्व वस्तू आणि सेवा या ऑनलाईन अथवा डिजिटल माध्यमातून पुरवल्या जात आहेत त्यामुळे मानवी जीवन सुखकर झालेले आहे. अत्यंत कमी वेळात आणि कमी कष्टात आपल्याला वस्तू व सेवा यांचा लाभ मिळत असतो.
खाजगी स्तरावर मिळणाऱ्या वास्तविक सुविधा या सरकारी स्तरावर देखील मिळत असतात. त्यांचा लाभ अनेकांना मिळत असतो कारण फसवणूक होण्याची शक्यता कमी असते आणि खूप मोठी जनसंख्या त्या सुविधांचा वापर करत असते.
वरील संकल्पना विस्तार केल्यास असे समजेल की, सध्या जे काही डिजिटल प्लॅटफॉर्मवर खाजगी मार्गाने मिळते किंवा सेवेचा लाभ होत आहे तोच लाभ आपल्याला सरकार देखील त्यांच्या डिजिटल इंडिया प्लॅटफॉर्म वरून उपलब्ध करून देण्याच्या मार्गावर आहे.
डिजिलॉकर म्हणजे काय – What is DigiLocker in Marathi
आपल्याला आपली कागदपत्रे सतत साठवून ठेवणे किंवा वारंवार ती नवीन काढणे गैरसोयीचे ठरते. सध्या अशा कागदपत्रांचा वापर बहुतेकरित्या ऑनलाईनच होत असतो. त्यामुळे कागदपत्रे ऑनलाईन साठवून ठेवण्यासाठी गूगल ड्राईव्ह हे गूगलने निर्मित केलेले ऍप आहे.
गूगल ड्राईव्ह किंवा अन्य प्लॅटफॉर्मबद्दल अजूनही लोकांमध्ये तेवढी विश्वासार्हता नाहीये. त्यामुळे आपली कागदपत्रे आणि अन्य डाटा सुरक्षित राहतीलच हे सांगता येत नाही. हा सुरक्षेचा मुद्दा सुधारून भारत सरकारने एक डिजिटल स्टोरेज प्लॅटफॉर्म तयार केलेले आहे. त्याला डिजिटल लॉकर म्हणजेच डिजीलॉकर असे नाव देण्यात आले.
डिजिलॉकर हे जुलै 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लॉन्च केले गेले होते. डिजिलॉकरचा फायदा असा आहे की, आपली सर्व कागदपत्रे सुरक्षित राहतील याची ग्वाही देण्यात येते कारण भारत सरकार डिजिलॉकरशी निगडित असल्याने तो विश्वास देशातील नागरिकांना वाटतो.
नागरिकत्व, शैक्षणिक आणि आर्थिक स्वरूपाची कागदपत्रे आपण डिजिलॉकरमध्ये साठवून ठेवू शकतो. डिजिलॉकरचा लाभ घेण्यासाठी आपल्याला अधिकृत आधार कार्डची आवश्यकता भासते. त्यानंतर कागदपत्रे इतरत्र कोठेही जमा करायची नसतात तर त्यांना ऑनलाईन सेव्ह करायचे असते.
बहुतांश भारतीय नागरिक सध्या ऑनलाईन व्यवहार करत आहेत, विविध ऑनलाईन सेवांचा लाभ घेत आहेत. अशा सेवांसाठी पॅनकार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले अशी वेगवेगळी डॉक्युमेंट्स नियमित अपलोड करायची त्यांना गरज भासते.
डिजिलॉकरच्या माध्यमातून ती कागदपत्रे लोकं कोणत्याही क्षणी कोणत्याही ठिकाणी वापरू शकतात. सतत कागदपत्रे जवळ बाळगणे ही चिंतेची बाब असू शकते कारण ती हरवल्यास पुन्हा प्राप्त करणे हे खूप साऱ्या वेळेचे नुकसान आहे.
डिजिलॉकरच का वापरावे –
गूगल ड्राईव्ह आणि ड्रॉप बॉक्स यांसारखे क्लाउड स्टोरेज हे विदेशी आहे. देशातील लोकांना त्याची security वाटत नाही. भारत सरकारने याचाच विचार केला आणि डिजिलॉकर हे पर्सनल स्टोरेज लोकांसाठी उपलब्ध करून दिले.
नेट बँकिंग किंवा इतर आर्थिक व्यवहार करण्याची जेवढी संकेतस्थळे आहेत त्यांच्याही पेक्षा जास्त सुरक्षा डिजिलॉकर प्रदान करते.
तुम्हाला डिजिलॉकर – मराठी माहिती (Digilocker information in Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…
Digital lokar