“देव सगळ्यांच्या जोड्या वरच बनवतो” सगळ्यात मोठी अफवा!

मराठी चित्रपट असो किंवा हिंदी चित्रपट. सर्व चित्रपटात आपल्याला एकच डायलॉग वारंवार ऐकायला मिळतो, तो म्हणजे “देव सगळ्यांच्या जोड्या वरच बनवतो.” हे सत्य आहे की नाही याचा जास्त विचार न करता आपण तसेच तो चित्रपट पाहत राहतो, परंतु हे वाक्य सतत ऐकल्याने काहीजण याच्यावर विश्वास ठेवू लागतात. खूप जण तर रिलेशनशिपमध्ये असताना हा डायलॉग सतत बोलतात.

यावरून आपल्याला समजते की देवाचा हात असो किंवा नसो मात्र जोडी तर बनणारच आहे. जर एखादा फॅमिली चित्रपट असेल, मग अशा डायलॉगची तर भडिमार असते. हेच वाक्य जर हिंदी चित्रपटात असले तर “भगवान सब की जोड़ियां ऊपर ही बनाता है” अशा स्वरूपात ऐकायला मिळते. परंतु एक सामाजिक व्यवस्था म्हणून लग्नाची मांडणी करण्यात आली असा साधा विचार कोणी करत नाही.          

व्यक्तीची शारीरिक गरज आणि मानसिक गरज ही वेगळी असून ती गरज दोन विरोधी व्यक्ती एकत्र आल्याने पूर्ण होते. पुढील पिढी वाढवण्यासाठी लग्न हा पर्याय समाजाने स्वीकारला असावा. माणसाचेच मुल खूप नाजूक स्वरूपात असते. त्याच्यावर होणारे संस्कार हे त्याचे आयुष्य घडवत असते. यामुळेच त्याला एका प्रेमळ वातावरणाची गरज असते. हे वातावरण कुटुंबात पूर्ण होते. असा सारासार विचार करत आपण ज्या समाजात वाढलो त्याच समाजातील मुलगी किंवा मुलगा वधू किंवा वर म्हणून स्वीकारतो. याचे काही वेगळे कार्य नसून स्त्री व पुरुष यांच्यात असणारे आकर्षण टिकवून ठेवण्यासाठी व त्यांना भविष्यात असणारे सुख जाणून घेण्यासाठी अशा स्वरूपाची काही वाक्ये किंवा अशा प्रकारचा एखादा विश्वास त्यांच्यात लहानपणापासूनच रुजवावा लागतो.     

टीव्ही हे माध्यम खूपच प्रभावी असून त्यात होत जाणारे विविध सामाजिक विषयांचे संक्रमण खूपच वाखाणण्याजोगे आहे. परंतु काही अंधश्रद्धा व हवेतल्या गोष्टी सुद्धा चित्रपटात बोलल्या जातात. चित्रपटाचे मार्केटिंग व त्याचा होणारा व्यवसाय याकडेच लक्ष असल्याने जन्मोजन्मीच्या गोष्टी, ठार मारण्याच्या गोष्टी, अपार प्रेमाच्या गोष्टी सुद्धा केल्या जातात. माणसात असणाऱ्या सर्व भावना, गुण या सर्वोच्च स्वरूपात व अतिशयोक्ती रूपात बोलल्या व मांडल्या जातात. अशा वारंवार ऐकल्या जाणाऱ्या डायलॉगचा आपण किती विचार करतो? यावर आपली त्या चित्रपटावरची पकड समजते. असेच आणखी काही डायलॉग तुम्हाला माहीत असल्यास नक्की कमेंट करा.

हे जरूर वाचा- “साहो” ने केलं निराश, कथा आणि Review वाचून तुम्हीही व्हाल थक्क…

Leave a Comment