क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड माहिती । Credit Card Vs Debit Card

आपल्याला बॅंकेकडून अनेक सुविधा मिळत असतात. त्यामधील क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड या सुविधा देखील आहेत. त्याचे फायदे, तोटे, आणि फरक आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. प्रस्तुत लेखात क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड विषयी सर्व माहिती (Credit Card and Debit Card Information In Marathi) सांगण्यात आलेली आहे.

डेबिट कार्ड – Debit Card

डेबिट कार्डलाच एटीएम कार्ड असे देखील म्हणतात. एटीएम मशीनद्वारे आपण आपले बँकेतील पैसे काढू शकतो. पैसे काढण्यासाठी प्रत्येकवेळी बँकेतच जाण्याची गरज नसते किंवा बँकेत जाऊन रांगेत उभे राहण्याची गरज नसते.

कार्ड वापरण्याचे काही वार्षिक सर्व्हिस चार्जेस असतात. ते चार्जेस तुमच्या चालू अथवा बचत खात्यातून वर्षअखेरीस वजा होतात. डेबिट कार्ड तुमच्या खात्याशी जोडलेले असते. डेबिट कार्ड सोबत तुम्हाला चार अंकी पासवर्ड (पिन) दिला जातो. तो पिन वापरून तुम्ही तुमचे आर्थिक व्यवहार करू शकता.

तुम्हाला तुमच्या आवडीचा चार अंकी पिन ठेवायचा असेल तर ते तुम्ही एटीएम मशीनद्वारे करू शकता. त्यामुळे डेबिट कार्ड वापरणे म्हणजे आपले खाते आपणच चालवणे असा त्याचा निव्वळ अर्थ घेता येईल.

डेबिट कार्डचे फायदे –

• रोख रक्कम स्वतः जवळ ठेवणे गरजेचे नाही.

• हवे तेव्हा बँक खात्यातील पैसे काढू शकता.

• ऑनलाईन खरेदी आणि दुकानातील इतर व्यवहार देखील शक्य.

क्रेडिट कार्ड – Credit Card

क्रेडिट कार्डचा वापर डेबिट कार्ड प्रमाणे होऊ शकतो परंतु क्रेडिट कार्डसाठी बँकेत खाते असणे गरजेचे नाही. फायनान्स कंपन्या देखील आपल्याला क्रेडिट कार्ड प्रदान करू शकतात.

तुमची आर्थिक व्यवहार करण्याची आणि ती रक्कम परत करण्याची क्षमता लक्षात घेऊन व्यवहाराची मर्यादा निश्चित करण्यात येते. क्रेडिट कार्डद्वारे महिन्याभरात केलेले व्यवहाराची रक्कम व्याजासहित निर्धारित केलेल्या तारखेपर्यंत भरायची असते.

रक्कम न भरल्यास दंड आकारण्यात येतो. त्यामुळे व्याज आणि दंड यामध्येच क्रेडिट कार्ड कंपन्यांचा फायदा असतो.

क्रेडिट कार्डचे फायदे –

• बँक खात्यामध्ये पैसे नसले तरी व्यवहार करू शकता.

• महागड्या वस्तूंची खरेदी परवडेल अशा हफ्त्यांमध्ये करू शकता.

• अत्यंत गरजेच्या समयी पैसे काढू शकतो. परंतु त्यावर परतफेड म्हणून जास्त व्याज भरावे लागते.

डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड मधील फरक –
Difference between Debit Card and Credit Card In Marathi

१. डेबिट कार्ड वापरून व्यवहार करताना बँकेत स्वतःचे खाते असावे लागते. म्हणजेच स्वतःचेच पैसे तुम्ही व्यवहारात वापरता. परंतु क्रेडिट कार्ड वापरताना बँकेकडून पैसे उसने घेतले जातात.

२. डेबिट कार्डद्वारे काढण्यात आलेल्या रकमेवर व्याज द्यावे लागत नाही परंतु क्रेडिट कार्डद्वारे काढण्यात आलेल्या रकमेवर व्याज द्यावे लागते.

३. क्रेडिट कार्डपेक्षा डेबिट कार्डचा सर्व्हिस चार्ज खूपच कमी असतो.

४. डेबिट कार्ड व्यवहार मर्यादा ही खात्यातील रकमेवर अवलंबून असते तर क्रेडिट कार्ड व्यवहार मर्यादा ही बँक निश्चित करत असते.

५. डेबिट कार्डचा वापर हा भारतापुरता मर्यादित आहे. परदेशात क्रेडिट कार्डचा उपयोग करावा.

६. दैनंदिन व्यवहारात डेबिट कार्ड उपयुक्त तर महागड्या वस्तुंच्या खरेदीसाठी क्रेडिट कार्डचा वापर योग्य ठरतो.

डेबिट कार्ड व क्रेडिट कार्डची माहिती (Debit Card and Credit Card Information In Marathi) तुम्हाला उपयुक्त वाटल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment