व्यायाम अनेक जणांना खूप बोअरिंग वाटतो. परंतु व्यायाम करण्याचे महत्त्व आणि फायदे जाणून घेतले तर आपल्याला नियमित व्यायाम करावासा वाटेलच! प्रस्तुत लेखात व्यायामाचे फायदे (Vyayamache Fayde) सांगण्यात आलेले आहेत. दिलेल्या माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल अशी आशा…
व्यायाम करण्याचे फायदे | Benefits of Exercise in Marathi |
१. शारिरीक वाढ
व्यायाम करताना जरी थोड्या वेदना होत असल्या तरी त्यानंतर अत्यंत उत्साह जाणवतो. शरीरात ताकद आणि ऊर्जा संचारते. शारिरीक स्नायू मजबूत बनतात आणि वाढीस लागतात. परिणामी वजन आणि उंची वाढते.
२. रोगप्रतिकारक शक्ती
आपल्या सभोवताली बदलणारे हवामान हे कधी कधी आजाराला निमंत्रण देणारे ठरते. तसेच संसर्गजन्य आजार देखील आपले आरोग्य बिघडवू शकतात. त्यांना प्रतिकार म्हणून आपली रोगप्रतिकारक शक्ती कामी येते.
व्यायाम केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढीस लागते. तसेच शरीराच्या अंतर्गत झालेले बिघाड देखील व्यवस्थित होतात.
३. रक्ताभिसरण
व्यायाम करताना अतिरिक्त श्वासोच्छवास होत असल्याने जास्त प्रमाणात ऑक्सिजन शरीरात घेतला जातो. रक्त शुद्ध होते तसेच रक्त प्रवाह देखील सुधारतो. त्यामुळे एकूणच रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते.
४. पचनक्रिया
मानसिक व शारिरीक स्वास्थ्य हे बहुतांश प्रमाणात आपल्या पचन प्रक्रियेवर अवलंबून असते. आपण खाल्लेले अन्न व्यवस्थित पचले तर आपला दिवस एकदम उत्साही व्यतित होत असतो.
व्यायाम केल्याने पचनसंस्था क्रियाशील बनते. सर्व पाचकतत्त्वे व्यवस्थित उत्सर्जित होतात. परिणामी आपले पचन सुधारते. तथापि जेवण केल्यानंतर व्यायाम करणे टाळावे.
५. त्वचा
नियमित व्यायाम केल्याने शरीरातील विषारी घटक घामावाटे बाहेर फेकले जातात. त्यामुळे त्वचा टवटवीत राहण्यास मदत होते. त्वचा टवटवीत राखण्यासाठी अन्य सौंदर्य प्रसाधने वापरावी लागत नाहीत.
मानसिक स्वास्थ्य
एका निरोगी शरिरातच एक निरोगी मन वास करत असते. नियमित व्यायाम केल्याने शारिरीक समस्या दूर होऊन उत्साह जाणवतो. आपले शरीर निरोगी बनत जाते. शारिरीक क्रिया व्यवस्थित झाल्या की मन प्रसन्न राहू लागते. म्हणजेच आपले मानसिक स्वास्थ्य सुधारते.
• व्यायाम करताना घ्यावयाची काळजी –
१. व्यायामासाठी प्रशिक्षक निवडावा.
२. व्यायाम करताना अति करू नये. शरीर प्रक्रिया व रचना समजून घेऊन हळूहळू सुरुवात करावी.
३. आहारात देखील सल्ल्यानुसार योग्य तो बदल करावा.
तुम्हाला व्यायामाचे फायदे (Vyayamache Fayde) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…